Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी सुस्त; आयटी, मेटल आणि फार्मा शेअर्स वाढले

Share Market Today: शुक्रवारी (27 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात थोडीशी सुस्त होती. सेन्सेक्स आणि निफ्टी लाल आणि हिरव्या चिन्हांमध्ये फिरताना दिसले. मात्र, उघडताच सेन्सेक्सने नवा विक्रमी उच्चांक गाठला. निर्देशांक 85,800 च्या वर व्यवहार करत होता.
Share Market Today
Share Market OpeningSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 27 September 2024: शुक्रवारी (27 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात थोडीशी सुस्त होती. सेन्सेक्स आणि निफ्टी लाल आणि हिरव्या चिन्हांमध्ये फिरताना दिसले. मात्र, उघडताच सेन्सेक्सने नवा विक्रमी उच्चांक गाठला.

निर्देशांक 85,800 च्या वर व्यवहार करत होता. त्याच वेळी निफ्टी 25,222 च्या आसपास होता. बँक निफ्टी जवळपास 118 अंकांनी वाढून 54,200 च्या वर होता. आज आयटी, मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये वाढ झाली.

Share Market Today
Share Market OpeningSakal

जागतिक बाजारात तेजी कायम

गुरुवारी अमेरिकन बाजार वाढीसह बंद झाले. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 0.62 टक्क्यांनी वाढून बंद झाला. S&P 500 निर्देशांक 0.40 टक्क्यांनी वाढला आणि टेक-केंद्रित निर्देशांक Nasdaq 0.60 टक्क्यांनी वाढला.

आज शुक्रवारी आशियाई बाजारात संमिश्र कल आहे. जपानचा Nikkei 0.52 टक्क्यांनी वर आहे, तर Topix 0.23 टक्क्यांनी घसरला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.18 टक्के आणि कोस्डॅक 0.15 टक्के घसरला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक चांगली सुरूवात करण्याची शक्यता आहे.

Share Market Today
Share Market OpeningSakal
Share Market Today
Raghuram Rajan: रघुराम राजन यांनी मोदी सरकारचे केले कौतुक; म्हणाले, गेल्या 10 वर्षात...

कोणते शअर्स तेजीत?

सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्सवरील जवळपास निम्मे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या सत्रात आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. सुमारे 2.60 टक्क्यांनी इन्फोसिस सर्वात तेजीत आहे.

टेक महिंद्राही अडीच टक्क्यांहून अधिक वर आहे. HCL Tech आणि TCS चे शेअर्स देखील 2 टक्क्यांपेक्षा जास्त नफ्यात आहेत. दुसरीकडे, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये सर्वाधिक 2.27 टक्के, एल अँड टी सुमारे 2 टक्के आणि भारती एअरटेल सुमारे 2 टक्क्यांनी घसरले आहे.

Share Market Today
BSE SENSEXSakal

या आठवड्यात नवे रेकॉर्ड झाले

देशांतर्गत शेअर बाजाराने या आठवडयात सातत्याने नवे उच्चांक नोंदवले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला बाजाराने नव्या उच्चांकासह सुरुवात केली होती. काल, गुरुवारीही रेकॉर्ड बनवण्याची प्रक्रिया सुरू होती.

Share Market Today
IPO Alert: शेअर बाजारात धमाका! 151 कोटींच्या IPO साठी 24,000 कोटींची बोली, काय करते मुंबईची कंपनी?

गुरुवारच्या व्यवहारात सेन्सेक्सने 85,930.43 अंकांची तर निफ्टीने 26,250.90 अंकांची नवीन उच्चांकी पातळी गाठली. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स 666.25 अंकांच्या (0.78 टक्के) वाढीसह 85,836.12 अंकांवर आणि निफ्टी 211.90 अंकांच्या (0.81 टक्के) वाढीसह 26,216.05 अंकांवर बंद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.