Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, निफ्टीही 100 अंकांनी वधारला

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात आज (गुरुवार, 10 ऑक्टोबर) जोरदार सुरुवात झाली. सुमारे 300 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 81,700 च्या वर उघडला, तर निफ्टीही सुमारे 100 अंकांच्या वाढीसह 25,100 च्या जवळ उघडला.
Share Market Today
Share Market OpeningSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 10 October 2024: देशांतर्गत शेअर बाजारात आज (गुरुवार, 10 ऑक्टोबर) जोरदार सुरुवात झाली. सुमारे 300 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 81,700 च्या वर उघडला, तर निफ्टीही सुमारे 100 अंकांच्या वाढीसह 25,100 च्या जवळ उघडला. बँक निफ्टी देखील 160 हून अधिक अंकांनी वाढला आणि हा निर्देशांक 51,150 च्या आसपास व्यवहार करत होता.

निफ्टीवरील मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही वाढ झाली. मिडकॅप निर्देशांक 370 अंकांच्या वाढीसह 59,400 च्या वर जात होता. त्याच वेळी, स्मॉलकॅप निर्देशांक 100 अंकांच्या वाढीसह 18,900 च्या वर व्यवहार करत होता.

Share Market Today
Share Market OpeningSakal
कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. वाढत्या शेअर्समध्ये टाटा केमिकल्स 4.24 टक्के, भेल 2.74 टक्के, ओबेरॉय रिॲल्टी 2.47 टक्के, डीएलएफ 2.20 टक्के, नाल्को 2.29 टक्के, पॉलीकॅब 2.24 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.

इंडियन हॉटेल्समध्ये 2.69 टक्के वाढ झाली आहे. घसरलेल्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस 1.97 टक्के, डिव्हिस लॅब 0.80 टक्के, सीमेन्स 1.01 टक्के, ट्रेंट 0.80 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Share Market Today
Ratan Tata: सुस्वागतम... मोदींच्या एका मेसेजनंतर रतन टाटांनी नॅनोचा कारखाना गुजरातला कसा नेला?
Share Market Today
Share Market OpeningSakal
क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

एफएमसीजी, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांतील शेअर्स वेगाने वाढत आहेत. बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, एनर्जी, ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेटचे शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत. निफ्टीचा मिडकॅप इंडेक्स 0.55 टक्क्यांच्या वाढीसह, निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.80 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. निफ्टी बँक निर्देशांक 131 अंकांच्या किंवा 0.26 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

Share Market Today
BSE SENSEXSakal
काय आहेत जागितक संकेत?

आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत चांगले दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. याआधी बुधवारी अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाले होते.

बुधवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 432 अंकांनी वाढून 42,512 च्या पातळीवर बंद झाला. नॅसडॅक कंपोझिट 109 अंकांनी वाढून 18291.62 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक 41 अंकांनी वाढून 5792.04 च्या पातळीवर बंद झाला.

Share Market Today
Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

आज बाजाराचे लक्ष बड्या कंपन्यांच्या तिमाही निकालांवर असणार आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. याशिवाय Tata Elexi, IREDA चे निकालही जाहीर केले जातील. याशिवाय आर्केड डेव्हलपर्स, आनंद राठी वेल्थ देखील निकाल जाहीर करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.