Share Market Opening Latest Update 7 October 2024: देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार विक्रीनंतर या आठवड्यात दिलासा मिळण्याची आशा आहे. दरम्यान, सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये निर्देशांकांवर व्यवहाराची जोरदार सुरुवात झाली आहे. उघडल्यानंतर सेन्सेक्स 400 अंकांनी वर होता.
निफ्टी 100 अंकांपर्यंत वाढ नोंदवत होता. सेन्सेक्स 82,068 च्या आसपास होता. निफ्टी 25,125 च्या आसपास धावत होता. निफ्टी बँकेतही 300 हून अधिक अंकांची वाढ झाली आणि निर्देशांक 51,770 च्या वर होता. मिडकॅप 320 अंकांच्या आसपास आणि स्मॉलकॅपने 130 अंकांच्या आसपास वाढ नोंदवली.
बीएसई सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये 30 शेअर्सपैकी 18 शेअर्समध्ये वाढ आणि 12 शेअर्स घसरत आहेत. सेन्सेक्समध्ये आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एचसीएल, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. घसरलेल्या शेअर्समध्ये टायटन, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचा समावेश आहे.
निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 30 शेअर्समध्ये वाढ होत आहे आणि 19 शेअर्समध्ये घसरण होत आहे आणि 1 शेअर कोणताही बदल न करता व्यवहार करत आहे. यामध्येही आयटीसी टॉप गेनर राहिला असून कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स वधारत आहेत. घसरलेल्या शेअर्समध्ये टायटन आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
गिफ्ट निफ्टी आज शेअर बाजाराच्या तेजीचे संकेत देत आहे आणि आज तो 89.15 अंकांच्या किंवा 0.35 टक्क्यांच्या वाढीसह 25,263 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. या आधारावर आज निफ्टी 25,000च्या पुढे उघडेल अशी अपेक्षा होती. बाजार तज्ज्ञांच्या मते, निफ्टीला 24,700 चा सपोर्ट लेव्हल दिसू शकतो.
शुक्रवारी अमेरिकन बाजारांमध्ये तेजी दिसून आली. शुक्रवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 341 अंकांनी वधारला आणि 42,352.75 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite 219 अंकांनी वाढून 18137.85 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 51 अंकांनी वाढून 5,751.07 च्या पातळीवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. आज GIFT NIFTY मध्ये 0.26 टक्के वाढ झाली आहे तर Nikkei 225 मध्ये 2.14 टक्के वाढ दिसून आली आहे. स्ट्रेट्स टाइम्स 0.21 टक्के वाढला आहे तर हँग सेंग सुमारे 1.06 टक्के वाढला आहे. तैवान वेटेड 1.24 टक्के वाढ दर्शवत आहे तर शांघाय कंपोझिट सुमारे 1.07 टक्क्यांनी तेजीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.