Stock Market vs Gold: सोने की शेअर बाजार, कोण करणार मालामाल? काय सांगतात तज्ज्ञ

Stock Market vs Gold: सोने-चांदी असो की शेअर बाजार, चालू वर्षात गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे. सोने-चांदीचा आणि शेअर बाजाराचा चालू वर्षातील परतावा पाहिला तर दोघांनीही सारखाच परतावा दिला आहे.
Stock Market vs Gold
Stock Market vs GoldSakal
Updated on

Stock Market vs Gold: सोने-चांदी असो की शेअर बाजार, चालू वर्षात गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे. सोने-चांदीचा आणि शेअर बाजाराचा चालू वर्षातील परतावा पाहिला तर दोघांनीही सारखाच परतावा दिला आहे. सेन्सेक्सने 85 हजार अंकांची पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे, सोन्याचा भाव सध्या 76,700 रुपयांपेक्षा जास्त आहे. या दोघांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे.

सध्या दोघेही कमाईच्या बाबतीत समान पातळीवर आहेत. जर आपण दोन्हींचे आकडे पाहिले तर सेन्सेक्स सोन्याच्या पुढे असल्याचे दिसते. चालू वर्षातील शेअर बाजाराचे आकडे खूपच चांगले आहेत. मुंबई शेअर बाजाराने आता 85 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर चालू वर्षात सेन्सेक्स 12,804.59 अंकांनी वाढला आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 72,240.26 अंकांवर होता, जो 85,044.85 अंकांच्या उच्चांकावर पोहोचला. याचा अर्थ चालू वर्षात सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना 17.72 टक्के परतावा दिला आहे.

दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा मुख्य निर्देशांक निफ्टीही परतावा देण्याच्या बाबतीत चांगला राहिला आहे. विशेष म्हणजे निफ्टीने गुंतवणूकदारांना सेन्सेक्सपेक्षा 2 टक्के अधिक परतावा दिला आहे. मात्र, निफ्टी अजूनही 26 हजार अंकांची पातळी गाठण्यासाठी धडपडत आहे.

जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, चालू वर्षात निफ्टीमध्ये 4,250.1 अंकांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, निफ्टी 21,731.40 अंकांवर होता, जो 25,981.50 अंकांच्या उच्चांकावर पोहोचला. याचा अर्थ निफ्टीने गुंतवणूकदारांना 19.55 टक्के परतावा दिला आहे.

सोने आणि चांदीने किती परतावा दिला?

सोने-चांदीने सेन्सेक्स- निफ्टी बरोबर समान परतावा दिला आहे. सोन्यात चालू वर्षात देशातील फ्युचर्स मार्केट मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर प्रति दहा ग्रॅम 11,434 रुपयांची वाढ दिसून आली आहे.

गेल्या वर्षीच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, एमसीएक्सवर सोने 63,203 रुपये प्रति ग्रॅम होते, जे वाढून 74,637 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहे. याचा अर्थ चालू वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 18 टक्के परतावा दिला आहे.

Stock Market vs Gold
JSW Group: सज्जन जिंदाल यांचा मोठा निर्णय! 40,000 कोटींचा ईव्ही प्रकल्प ओडिशातून महाराष्ट्रात हलवणार

दुसरीकडे चांदीने 90 हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. आकड्यांवर नजर टाकली तर चालू वर्षात चांदीच्या दरात प्रतिकिलो 15,888 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव 74,440 रुपये प्रति किलो होता.

जो मंगळवारी 90,328 रुपये प्रति किलोपर्यंत वाढताना दिसत आहे. याचा अर्थ चांदीने गुंतवणूकदारांना 21.34 टक्के परतावा दिला आहे. प्रत्यक्षात सोन्यापेक्षा चांदीने 3 टक्के अधिक परतावा दिला आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अनुज गुप्ता यांनी सांगितले की, यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने आयात शुल्कात कपात केली आहे. त्यानंतर सोन्याच्या दरात 6 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. जर आयात शुल्क कमी केले नसते तर सोन्याची किंमत 80 हजार रुपयांच्या वर गेली असती किंवा ती सेन्सेक्सच्या बरोबरीची झाली असती.

Stock Market vs Gold
Anmol Ambani: अनिल अंबानींचा मुलगा अनमोलवर सेबीची मोठी कारवाई; ठोठावला एक कोटी रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण?

ते पुढे म्हणाले की, सोन्यात अजूनही भरपूर क्षमता आहे. फेड धोरण आणि भू-राजकीय तणाव दोन्हींमुळे सोन्याची चमक वाढणार आहे. दुसरीकडे, सध्या शेअर बाजाराला फेड धोरणाचा पाठिंबा मिळत आहे.

भौगोलिक-राजकीय तणावाच्या काळात विदेशी शेअर बाजारात घसरण झाली, तर त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून येईल. येत्या काही महिन्यांत निरीक्षण करणे फार महत्वाचे आहे. सोन्याचा भाव प्रथम एक लाखावर पोहोचू शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.