Share Market Closing: शेअर बाजार किंचीत वाढीसह बंद; सेन्सेक्स 71,600 अंकांवर, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing Latest Update 9 February 2024: शुक्रवारी शेअर बाजारात चढउतार दिसून आला. सुरुवातीला प्रमुख बाजार निर्देशांक घसरले आणि नंतर वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 167 अंकांनी वाढून 71,595 वर पोहोचला. निफ्टी 64 अंकांनी वाढून 21,782 वर पोहोचला. बँकिंग क्षेत्रामुळे बाजारत उत्साह दिसून आला.
Share Market Closing
Share Market Closing Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 9 February 2024: शुक्रवारी शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. सुरुवातीला प्रमुख बाजार निर्देशांक घसरले आणि नंतर वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 167 अंकांनी वाढून 71,595 वर पोहोचला. निफ्टी 64 अंकांनी वाढून 21,782 वर पोहोचला. बँकिंग क्षेत्रामुळे बाजारात उत्साह दिसून आला. याशिवाय एफएमसीजी आणि आर्थिक क्षेत्रातही खरेदी झाली. तर वाहन आणि मेटल क्षेत्रात विक्री झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजारातील निर्देशांकांमध्ये निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स वगळता इतर सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो निर्देशांकात घसरण झाली.

शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला
शेअर बाजारात चढ-उतार दिसून आलाSakal

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शुक्रवारी पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. शेअर बाजारातील आघाडीच्या शेअर्समध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, एसबीआय, अपोलो हॉस्पिटल, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स होते.

Share Market Closing
SEBI: सेबीचा मोठा निर्णय! स्टॉक मार्केट टिप्स देणाऱ्या 'या' बिझनेस चॅनेलवरील तज्ज्ञांवर घातली बंदी

तर महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, भारती एअरटेल, एनटीपीसी, हिंदाल्को, टाटा स्टील आणि इन्फोसिसचे शेअर्समध्ये घसरण झाली.

भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइलच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ हे त्याचे कारण आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि बीपीसीएलच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे.

कोणते शेअर्स वाढले?
कोणते शेअर्स वाढले?Sakal
Share Market Closing
Nirmala Sitharaman: "...म्हणून अर्थव्यवस्था गंभीर संकटात"; निर्मला सीतारामन यांच्या श्वेतपत्रिकेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

गुंतवणूकदारांचे 1.78 लाख कोटी रुपयांचे नुकसान

8 फेब्रुवारी 2024 रोजी, BSE वर सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 388.21 लाख कोटी रुपये होते. आज म्हणजेच 9 फेब्रुवारी 2024 रोजी ते 386.43 लाख कोटी रुपयांवर घसरले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1.78 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.