Share Market Opening: एक्झिट पोलनंतर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टीने रचला इतिहास

Share Market Opening: सोमवारी (3 जून) लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या निकालानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या वाढीसह व्यवहार सुरू झाले आहेत. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले.
Share Market
Share Market OpeningSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 3 June 2024: सोमवारी (3 जून) लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या निकालानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या वाढीसह व्यवहार सुरू झाले आहेत. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले. निफ्टी प्रथमच 23,300 च्या वर उघडला आहे. निफ्टी बँकेत सुमारे 1600 अंकांची वाढ झाली असून सेन्सेक्सही पहिल्यांदाच 76,000 च्या पुढे व्यवहार करत आहे. तर निफ्टी 620 अंकांच्या वाढीसह 23151 अंकांच्या पातळीवर उघडला.

शनिवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची पूर्ण शक्यता आहे. मंगळवारी निकाल जाहीर होणार आहेत. याआधी सोमवारी बाजारात चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा होती.

Share Market Today
Share Market OpeningSakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी निर्देशांक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात घसरण दिसून आली, तर निफ्टी बँक, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी वित्तीय सेवा निर्देशांकात वाढ झाली.

Share Market Today
Share Market OpeningSakal

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, एसबीआय आणि लार्सन या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता. तर ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली त्या शेअर्समध्ये गॉडफ्रे फिलिप्स, डोम्स इंडस्ट्रीज, ग्लेनमार्क लाईफ, सुवेन फार्मा, सफारी इंडस्ट्रीज आणि सनोफी इंडिया यांचा समावेश होता.

Share Market
Amul Milk Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; अमूलने दुधाच्या दरात केली 'इतक्या' रूपयांची वाढ
Share Market Today
BSE SENSEXSakal

बीएसईचे बाजार भांडवल विक्रमी उच्चांकावर

बीएसईचे बाजार भांडवल 423.94 लाख कोटी रुपयांवर आले आहे, तर शुक्रवारी ते 412.23 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या कमाईत 11 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसईवर 3,100 शेअर्सचे व्यवहार होत असून त्यापैकी 2,670 शेअर्स वाढले आहेत. 328 शेअर्स घसरत आहेत आणि 102 शेअर्स कोणताही बदल न करता व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्समध्ये तुफान तेजी

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 30 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत तर पॉवर ग्रिड 7.08 टक्क्यांनी वाढून सर्वात तेजीत आहे. एनटीपीसीमध्ये 6.14 टक्के, एमअँडएममध्ये 5.23 टक्के, एलअँडटीमध्ये 5.15 टक्के आणि एसबीआयमध्ये 5 टक्के वाढ दिसून येत आहे.

Share Market
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक 7 जूनला रेपो दर करणार जाहीर; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

निफ्टीमध्येही तेजीचे वादळ

NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 48 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत तर फक्त 2 शेअर्स घसरत आहेत. अदानी पोर्ट्स 8.67 टक्क्यांनी आणि श्रीराम फायनान्स 7.04 टक्क्यांनी वाढून सर्वाधिक तेजीत आहे. अदानी एंटरप्रायझेसने 6.90 टक्के, पॉवर ग्रिडने 6.77 टक्के आणि एनटीपीसीने 5.54 टक्के झेप घेतली आहे. केवळ आयशर मोटर्स आणि एलटीआय माइंडट्री हे घसरणाऱ्या शेअर्समध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com