Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 52,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Today: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारातील तीव्र चढउतारांमुळे बेंचमार्क निर्देशांक सपाट बंद झाले. मेटल शेअर्समध्ये दिवसभर चढ-उतार दिसून आला.
Share Market Today
Share Market Latest UpdateSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 21 May 2024: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारातील तीव्र चढउतारांमुळे बेंचमार्क निर्देशांक सपाट बंद झाले. मेटल शेअर्समध्ये दिवसभर चढ-उतार दिसून आला. व्यवहाराच्या सत्राच्या अखेरीस, निफ्टी 27 अंकांनी वाढला आणि 22,529 वर बंद झाला. सेन्सेक्स 52 अंकांनी घसरून 73,953 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 151 अंकांनी घसरून 48,048 वर बंद झाला. सकाळी सेन्सेक्स-निफ्टी थोड्या घसरणीसह सपाट उघडले होते.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी मिडकॅपने इतिहास रचला आहे. निफ्टी मिडकॅप प्रथमच 52,000 च्या वर बंद झाला आहे. स्मॉल कॅप निर्देशांकात मात्र घसरण दिसून आली. परंतु आजच्या सत्रात ऊर्जा, मेटल, तेल आणि गॅस, कमोडिटी, फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर आयटी बँकिंग, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing
Share Market TodaySakal
Share Market Today
BSE Market Cap: भारतीय शेअर बाजाराने रचला इतिहास; बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप प्रथमच 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारात तेजी असणाऱ्या शेअर्समध्ये टाटा स्टील 3.69%, जेएसडब्ल्यू स्टील 3.68%, पॉवर ग्रिड 2.71%, टेक महिंद्रा 1.65%, एनटीपीसी 1.50%, एशियन पेंट्स 1.20%, एसबीआय 1.18%, महिंद्रा अँड महिंद्रा 0.71%, टीटान 0.71% टेक 0.27 टक्के, बजाज फायनान्स 0.20 टक्के, सन फार्मा 0.08 टक्के, रिलायन्स 0.08 टक्के वाढीसह बंद झाले. नेस्ले 1.37 टक्के, मारुती 1.03 टक्के, इंडसइंड बँक 0.85 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.84 टक्के घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing
Share Market TodaySakal
Share Market Today
Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता
Share Market Closing
S&P BSE SENSEXSakal

BSE मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावर

शेअर बाजारातील अनेक क्षेत्रातील शेअर्सच्या वाढीमुळे बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. बीएसई मार्केट कॅप 414.58 लाख कोटींवर बंद झाले जे मागील सत्रात 412.35 लाख कोटींवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.23 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.