Share Market Closing: शेअर बाजारात पुन्हा तेजी; सेन्सेक्स 73,000च्या वर बंद, कोणत्या क्षेत्रात वाढ?

Share Market Today: मंगळवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाले. आयटी, फार्मा आणि रियल्टी क्षेत्रात खरेदी झाली. सेन्सेक्स 305 अंकांनी वाढून 73,095 वर बंद झाला. निफ्टीही 76 अंकांनी वाढून 22,198 वर पोहोचला.
Share Market Closing Latest Update
Share Market Closing Latest UpdateSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 27 February 2024: मंगळवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. आयटी, फार्मा आणि रियल्टी क्षेत्रात खरेदी झाली. सेन्सेक्स 305 अंकांनी वाढून 73,095 वर बंद झाला. निफ्टीही 76 अंकांनी वाढून 22,198 वर पोहोचला.

शेअर बाजाराच्या व्यवहारात अनेक चढ-उतार आले आणि घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजारात चांगली रिकव्हरी झाली. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी असे म्हटले आहे की, जर तुम्ही शेअर्समध्ये मोठी घसरण होण्याची अपेक्षा करत असाल तर ते शक्य नाही.

मंगळवारी व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली, तर देवयानी इंटरनॅशनलचे शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Share Market
Share Market Sakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, धातू, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स, इन्फ्रा हेल्थकेअर, बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर तेल आणि गॅस, ऊर्जा आणि माध्यम क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

आजच्या व्यवहारात निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक घसरला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 7 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 29 शेअर्स वाढीसह आणि 21 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal
Share Market Closing Latest Update
Maharashtra Budget 2024: मागासवर्गीय, आदिवासी अल्पसंख्याक समाजासाठी अर्थसंकल्पात काय? अजित पवारांनी केल्या मोठ्या घोषणा

आज कोणते शेअर्स तेजीत?

भारती एअरटेल, सन फार्मा आणि सिप्ला यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. शेअर बाजारात घसरण झालेल्या शेअर्समध्ये Hero MotoCorp, Bajaj Finance, SBI, Divi's Labs, Bajaj Finserv, UPL आणि Adani Enterprises यांच्या शेअर्सचा समावेश होता. टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, सन फार्मा, सिप्ला, महिंद्रा, रिलायन्स आणि एसबीआय लाईफ यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले.

गुंतवणूकदारांचे 8,000 कोटी रुपयांचे नुकसान

मंगळवारच्या सत्रात भारतीय बाजार वाढीसह बंद झाला तर बाजाराच्या बाजार भांडवलात मागील सत्राच्या तुलनेत घसरण दिसून आली. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 391.97 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 392.05 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 8,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Share Market Closing Latest Update
Maharashtra Budget 2024: ग्रामसडक योजना ते सागरी बंदर; पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

निफ्टी ऑटो इंडेक्स विक्रमी उच्चांकावर होता

मंगळवारी निफ्टी ऑटो इंडेक्स 20,720.05 चा विक्रमी उच्चांक गाठला. इंट्राडे 0.38% वाढून निर्देशांक हा विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या 12 महिन्यांत निर्देशांकात 63% वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.