Share Market Closing: शेअर बाजारातील चमक परतली; सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद; आयटी आणि रियल्टी शेअर्स चमकले

Share Market Closing: शेअर बाजारातील व्यवहार गुरुवारी तेजीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 692 अंकांनी वधारून 75074 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 201 अंकांनी वधारून 22821 अंकांवर बंद झाला.
Share Market Latest Update
Share Market Latest UpdateSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 6 June 2024: गुरुवारी (6 जून) शेअर बाजाराची चमक परतल्याचे दिसून आले. आजही बाजारांनी मोठी तेजी सुरूच ठेवली. व्यवहार संपेपर्यंत सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या वाढीसह बंद झाले.

मंगळवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजीची नोंद झाली आहे. निफ्टी 201 अंकांनी वाढून 22,821 वर बंद झाला. सेन्सेक्स 692 अंकांनी वाढून 75,074 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 237 अंकांनी वाढून 49,291 वर बंद झाला.

Share Market Today
Share Market TodaySakal

आज मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही जोरदार खरेदी झाली, जिथे गेल्या दोन दिवसांत सरकारी कंपन्यांना फटका बसला होता, तिथे आज पुन्हा खरेदी होताना दिसत आहे. बंद होईपर्यंत, आयटी आणि रिअल्टी निर्देशांकात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली.

PSU शेअर्स वधारले

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, रेल विकास निगम, इरकॉन इंटरनॅशनल, टिटागड रेल सिस्टीम आणि टॅक्स मेको रेलचे शेअर्स 4 ते 5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचे शेअर्सही चार टक्क्यांनी वाढले, तर कोल इंडिया आणि एनटीपीसीचे शेअर्सही 2.5 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.

गुरुवारी, शेअर बाजाराच्या व्यस्त कामकाजादरम्यान, गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 9 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले, तर अदानी पोर्ट्समध्ये किंचित घसरण झाली.

Share Market Today
Share Market TodaySakal

मार्केट कॅपमध्ये 8 लाख कोटींची वाढ

शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 416.32 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात 408.06 लाख कोटी रुपये होते.

Share Market Today
BSE SENSEXSakal
Share Market Latest Update
RBI MPC: निवडणूक निकालानंतर RBIची पहिली बैठक; EMI वर उद्या होणार निर्णय

आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.26 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली. बीएसई मार्केट कॅप 4 जून रोजीच्या 426 लाख कोटींच्या उच्चांकापेक्षा अजूनही 10 लाख कोटी रुपये कमी आहे.

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे शेअर्स

आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्यातही इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4.46 टक्क्यांनी वाढ झाली. यानंतर, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

Share Market Latest Update
MP Salary: खासदारांना किती पगार मिळतो? कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक घसरलेले शेअर्स

सेन्सेक्सचे केवळ 7 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल) चे शेअर्स 1.84 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. याशिवाय एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()