Share Market Closing Latest Update 14 November 2024: आठवडाभरातील चढ-उतारानंतर शेअर बाजारात गुरुवारी (14 नोव्हेंबर) फ्लॅट क्लोजिंग झाली. दिवसभरातील अस्थिरतेनंतर बेंचमार्क निर्देशांक सपाट बंद झाले. सलग सहाव्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 26 अंकांनी घसरून 23,532 वर बंद झाला. सेन्सेक्स 110 अंकांनी घसरून 77,580 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 91 अंकांनी वाढून 50,179 वर बंद झाला.