Share Market Closing Latest Update 22 November 2024: भारतीय शेअर बाजारात आज (22 नोव्हेंबर 2024) मोठी वाढ दिसून आली. BSE सेन्सेक्स 1961 अंकांच्या वाढीसह बंद झाला. तर NSE निफ्टी 557 पेक्षा जास्त अंकांनी वाढला. अमेरिकेतील अदानी समूहावर लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर अदानी शेअर्समध्ये सुधारणा दिसून आली आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही नंतर वाढ दिसून आली.