Share Market Closing Latest Update 5 November 2024: घसरणीसह सुरुवात केल्यानंतर मंगळवारी शेअर बाजारात जबरदस्त रिकव्हरी झाली. कालच्या मोठ्या घसरणीनंतर बाजारातील घसरण कायम राहणार असे वाटत होते. पण आज बाजारात रिकव्हरी झाली. निफ्टी 217 अंकांच्या वाढीमुळे 24,213 वर बंद झाला. सेन्सेक्स 694 अंकांनी वाढून 79,476 वर आणि निफ्टी बँक 992 अंकांनी वाढून 52,207 वर बंद झाला.