Share Market: निफ्टीने गाठला नवा उच्चांक, बँकिंग शेअर्सने पहिल्यांदाच केला 21,600चा टप्पा पार

Share Market: बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी सतत वाढीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीने पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, निफ्टीने 21,603.40 चा नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला.
Share Market opening latest updates
Share Market opening latest updates Sakal
Updated on

Share Market: बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी सतत वाढीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीने पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, निफ्टीने 21,603.40 चा नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला. सध्या तो 21,589 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

निफ्टीमध्ये हिंदाल्कोचे शेअर्स 3.93 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक 602.65 रुपयांवर व्यवहार करत आहेत. टाटा मोटर्स, टाटा स्टील, एसबीआय लाईफ आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली.

जागतिक बाजारातील वाढीनंतर बँकिंग, ऑटो आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सच्या जोरावर बुधवारी भारतीय शेअर बाजारात तेजीसह व्यवहार सुरू झाला होता.

नोव्हेंबर महिन्यात, सेन्सेक्स आणि निफ्टीने सुमारे 5% ची वाढ दर्शविली आहे आणि डिसेंबर महिन्यात आतापर्यंत ते 7% पर्यंत वाढले आहेत. 27 डिसेंबरच्या दुपारपर्यंत निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 40 शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

यापैकी सुमारे 13 शेअर्स 52 आठवड्यांच्या शिखरावर व्यवहार करत आहेत. तर 9 शेअर्स विक्रमी उच्चांकावर आहेत. बाजारातील या नेत्रदीपक वाढीची कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.

बाजारातील वाढीची कारणे:

1. बुधवारी परदेशी बाजारातूनही चांगले संकेत मिळाले. मंगळवारी अमेरिकन बाजार अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर डाऊ जोन्स आणि नॅस्डॅक अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. आशियाई बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे.

Share Market opening latest updates
RBI: चालू खात्यातील तूट ‘जीडीपी’च्या एक टक्क्यावर; रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अहवाल

2. यूएस सेंट्रल बँकेकडून आणखी दर कपातीचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेत चलनवाढीचा दर नरमल्याने शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. फेडरल रिझर्व्ह पुढील वर्षी मार्चपासून व्याजदरात कपात करू शकते.

बाजाराचा अंदाज आहे की फेड 80 बेसिस पॉइंट्सपर्यंत दर कमी करू शकते. जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा आर्थिक व्यवस्थेतील पैशाचा प्रवाह वाढतो. यामुळे कंपन्यांच्या नफ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.

3. जागतिक रेटिंग एजन्सी फिचचा अंदाज आहे की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. 2024-25 पर्यंत भारताचा GDP 6.5% असण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षासाठी तो 6.9% असण्याचा अंदाज आहे.

Share Market opening latest updates
'या' सरकारी कंपनीने जिंकली 900 MW सोलर प्रोजेक्ट्ससाठीची बोली; 1 वर्षात दिला 85 टक्के परतावा

4. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार नोव्हेंबर महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. नोव्हेंबरमध्ये 24,546 कोटींची गुंतवणूक केल्यानंतर, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) डिसेंबरमध्ये आतापर्यंत 78,903 कोटींची गुंतवणूक केली आहे.

5. या वर्षी आतापर्यंत बाजारातील वाढीचे मुख्य कारण लहान आणि मध्यम शेअर्समध्ये झालेली वाढ हे आहे. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये वाढ सुरूच आहे. पण, आता लार्ज कॅप शेअर्सनेही वेग पकडायला सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()