Share Market Opening: शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर; कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: सोमवारी शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात जोरदार झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला. निफ्टीने पहिल्यांदाच 25,900 चा टप्पा पार केला आणि सेन्सेक्सनेही पहिल्यांदा 84,800 चा टप्पा पार केला. निफ्टी बँकेत किंचित वाढ झाली.
Share Market
Share Market OpeningSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 23 September 2024: सोमवारी शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात जोरदार झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला. निफ्टीने पहिल्यांदाच 25,900 चा टप्पा पार केला आणि सेन्सेक्सनेही पहिल्यांदा 84,800 चा टप्पा पार केला. निफ्टी बँकेत किंचित वाढ झाली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही तेजी दिसून आली. टाटा स्टील, एचडीएफसी लाइफ, ग्रासिम हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. त्याच वेळी, व्होडाफोन आयडियाने सुमारे 6% ची वाढ नोंदवली.

Share Market Today
Share Market OpeningSakal

285 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 84,825 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर NSE चा निफ्टी 50 निर्देशांक सुमारे 106 अंकांच्या वाढीसह 25,898.25 अंकांच्या जवळ होता. निफ्टीने काही मिनिटांच्या व्यवहारात 25,910चे शिखरे गाठण्यात यश मिळवले.

Share Market Today
Share Market OpeningSakal
Share Market
EY Employee Death: 'कामाच्या ताणामुळे' CAचा मृत्यू... निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

जागतिक बाजारात संमिश्र कल

शुक्रवारी अमेरिकन बाजारात संमिश्र कल होता. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 0.09 टक्क्यांच्या किंचित वाढीसह बंद झाला. S&P 500 निर्देशांक 0.19 टक्क्यांनी घसरला आणि तंत्रज्ञान-केंद्रित निर्देशांक Nasdaq 0.36 टक्क्यांनी घसरला.

आज सोमवारी आशियाई बाजारात घसरण दिसून येत आहे. जपानमधील निक्की सार्वजनिक सुट्टीमुळे बंद आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.15 टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक आज घसरणीसह सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Share Market Today
BSE SENSEXSakal

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवरील बहुतांश शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात तेजीत व्यवहार करत आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा सुमारे 2 टक्क्यांनी वाढला होता. भारती एअरटेल, एनटीपीसी आणि एसबीआय सारख्या शेअर्समध्ये प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेत सर्वाधिक 1.30 टक्के घसरण झाली. एचसीएल टेक, इन्फोसिस, इंडसइंड बँक यांसारखे शेअर्सही घसरले होते.

Share Market
OYO Hotels: आता अमेरिकेत सुद्धा होणार ओयोची हवा! 43 अब्ज रुपये गुंतवून घेतला मोठा निर्णय

कसा आहे गुंतवणूकदारांचा कल?

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) 21 सप्टेंबर 2024 रोजी 14,064.05 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) 4,427.08 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.