Share Market Opening Latest Update 2 March 2024 (Marathi News): विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्स 73881 अंकांवर तर निफ्टी 22407 अंकांवर उघडला. आज शनिवारी शेअर बाजार एका खास कारणासाठी खुला आहे. डिजास्टर रिकवरी साइटची चाचणी NSE आणि BSE द्वारे केली जाणार आहे, ज्यामुळे बाजार खुला आहे. पहिले सत्र प्राथमिक ठिकाणी तर दुसरे सत्र डिजास्टर रिकवरी साइटवर असेल.
शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सत्रात निफ्टीने 22400 च्या वरच्या पातळीवर सुरुवात केली. जवळपास सर्वच क्षेत्रात थोडीफार खरेदी होताना दिसत आहे.
एल अँड टी, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कंझ्युमर्स, इंडसइंड बँक, टायटन कंपनी, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रासिम इंडस्ट्रीज हे शेअर्स मोठ्या वाढीसह उघडले. दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, एनटीपीसी, बीपीसीएल यांसारखे शेअर्स घसरणीसह उघडले. शुक्रवारी बाजारातील तुफान वाढीनंतर आज विशेष व्यापार सत्रात खरेदीदारांकडून उत्सुकता दिसून येत आहे.
शेअर बाजारात शनिवारी दोन सत्रात व्यवहार करता येतील. पहिल्या सत्रात सकाळी 9:15 ते सकाळी 10:00 पर्यंत व्यवहार होणार आहे. शेअर बाजाराचे दुसरे ट्रेडिंग सत्र हे डिझास्टर रिकव्हरी साइटवर होणार आहे जे सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 या वेळेत होणार आहे.
शुक्रवारी, जीडीपीच्या चांगल्या आकडेवारीनंतर बाजाराने मोठी झेप घेतली होती. शुक्रवारी सेन्सेक्स 1,245.05 अंकांच्या किंवा 1.72 टक्क्यांच्या वाढीसह 73,745.35 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 355.95 अंकांनी किंवा 1.62 टक्क्यांनी झेप घेऊन 22,338.75 अंकांवर राहिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.