Share Market Opening: यूएस फेडच्या निर्णयापूर्वी बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात, आयटी शेअर्सवर दबाव

Share Market Today: शेअर बाजार उघडण्याच्या वेळी, सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 82,973 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टीही जवळपास 30 अंकांच्या घसरणीसह 25,394 च्या पातळीवर होता.
Share Market Opening
Share Market OpeningSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 18 September 2024: शेअर बाजार उघडण्याच्या वेळी, सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 82,973 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टीही जवळपास 30 अंकांच्या घसरणीसह 25,394 च्या पातळीवर होता. निफ्टी बँक 52,204 च्या पातळीवर सपाट होता. निफ्टी मिडकॅप 61,190 च्या आसपास होता, पण नंतर त्यातही घसरण झाली.

सेन्सेक्स आणि निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

सकाळी 9.40 वाजता बीएसई सेन्सेक्स शेअर्समध्ये तेजी दिसत होती आणि घसरणाऱ्या शेअर्समध्येही आयटी शेअर्सचा मोठा वाटा आहे. आज आयटी शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमागे एक्सेंचर हे मुख्य कारण असल्याचे पाहिले जात आहे आणि आयटी निर्देशांक सुमारे 2.50 टक्क्यांनी घसरला आहे.

Share Market Today
Share Market OpeningSakal

NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 32 शेअर्समध्ये वाढ आणि 18 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. आज निफ्टी शेअर्समध्ये सर्वाधिक तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये हीरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, ब्रिटानिया आणि टाटा मोटर्स यांचा समावेश आहे आणि हे पाच शेअर्स टॉप 5 मध्ये आहेत.

सध्या एफएमसीजी शेअर्स बघितले तर आयटीसी, एचयूएल आणि ब्रिटानिया शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे आणि आज नेस्लेही या वाढीला हातभार लावत आहे.

Share Market Today
Share Market OpeningSakal

फेडच्या दर कपातीचा भारतीय बाजारांवर काय परिणाम होणार?

फेडच्या बैठकीपूर्वी भारतीय शेअर बाजारात एका बाजूचा कल दिसून येत आहे, परंतु आज संध्याकाळी फेड बैठकीचे निकाल येण्यास सुरुवात होईल, त्यानंतर भारतीय बाजारातही हालचाल दिसून येईल. असे मानले जाते की फेड आपल्या आगामी बैठकीत व्याजदर कमी करेल.

Share Market Opening
Rich Indians: भारतात करोडपतींच्या संख्येत मोठी वाढ; 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या 31,800वर, एवढा पैसा येतो कुठून?
Share Market Today
BSE SENSEXSakal

तसे झाल्यास गुंतवणूकदारांच्या आनंदाने शेअर बाजाराला नव्या विक्रमी उंचीवर नेले तर नवल वाटायला नको. सर्व काही अनुकूल राहिल्यास, आपण निफ्टीमध्ये 25800 ची ऐतिहासिक पातळी पाहू शकतो.

काय आहेत जागतिक संकेत?

आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसत आहेत. आजच्या व्यवसायात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये वाढ दिसून येत आहे. याआधी मंगळवारी अमेरिकन फेडच्या निर्णयापूर्वी अमेरिकन बाजार सावध राहिले.

Share Market Opening
Taj Hotel: टाटांच्या ताज हॉटेलने रचला इतिहास; भारतातील बनली नंबर वन कंपनी, किती आहे मार्केट कॅप?

मंगळवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 16 अंकांनी घसरला आणि 41606.18 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite मध्ये 36 अंकांची वाढ होऊन तो 17628.06 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 1 अंकाने वाढून 5634.58 च्या पातळीवर बंद झाला.

आज यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत आपला निर्णय जाहीर करणार आहे. यावेळी किमान 0.25 बेसिस दर कपातीची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.