Stock Split : शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक्स तुम्हाला कमी कालावधीत बंपर परतावा मिळवून देतात. अशात एफएमसीजी सेक्टरमधील स्मॉल कॅप कंपनी कम्फर्ट इंटेकवर (Comfort Intech) तुम्ही फोकस करु शकता.
या शेअरने गेल्या जवळपास 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1300% इतक दमदार परतावा दिला आहे. आता कंपनीने शेअर स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनी 1:10 च्या प्रमाणात शेअर्सचे विभाजन करणार आहे. यासाठी 14 एप्रिल 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. (Stock Split of Comfort Intech small cap stock have turned 1 lakh to 14 lakh in three years)
रेकॉर्ड डेट म्हणजे जेव्हा कंपनी कॉर्पोरेट ऍक्शनसाठी त्याचे रेकॉर्ड चेक करते आणि एलिजिबल शेअरहोल्डर्स निश्चित करते. कंपनी 10 रुपये फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअरचे 1 रुपयाच्या फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअर्समध्ये विभाजन करत आहे.
कम्फर्ट इंटेकने आपल्या गुंतवणूकदारांना शॉर्ट तसेच लाँग टर्ममध्ये उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या 5 दिवसांत त्याचे शेअर्स 24 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा दिला आहे.
या वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 25 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत, 1300% दमदार परतावा दिला आहे. त्याचे शेअर्स 5 वर्षांत 142 टक्क्यांनी वाढले आहेत.
कम्फर्ट इंटेकच्या गुंतवणूकदारांच्या पैशात केवळ 3 वर्षांत 14 पट वाढ झाली आहे. एप्रिल 2020 मध्ये एका शेअरची किंमत 2.32 रुपये होती, जी आज 33.50 रुपये झाली आहे.
याचा अर्थ असा की त्याने केवळ 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1343% इतका चांगला परतावा दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत सुमारे 14 लाख झाली असती.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.