Adani Group Stocks Rally: महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने जोरदार झेप घेतली आणि 80,000 ची पातळी ओलांडली.
तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 24,273 अंकांच्या उसळीसह व्यवहाराला सुरुवात केली. दरम्यान, सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वादळी वाढ दिसून आली आहे.