Ethanol from Sugarcane: केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाशी संबंधित धोरणांमध्ये मोठा बदल केला आहे. उसापासून इथेनॉल बनवण्यावरील बंदी सरकारने पूर्णपणे हटवली आहे. या मोठ्या निर्णयाची माहिती गुरुवारी एका अधिसूचनेत देण्यात आली. या बदलामुळे ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.