Wipro
Wiprosakal

अर्थबोध : विप्रो बायबॅक

विप्रो कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरच्या पुन:र्खरेदीचा (बायबॅक) निर्णय जाहीर केला आहे.
Published on
Summary

विप्रो कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरच्या पुन:र्खरेदीचा (बायबॅक) निर्णय जाहीर केला आहे.

विप्रो कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरच्या पुन:र्खरेदीचा (बायबॅक) निर्णय जाहीर केला आहे. बायबॅक म्हणजे, कंपनी स्वतःच आपले शेअर्स खरेदी करून ते रद्द करते आणि भागभांडवल कमी करते. एका शेअरमागे ४४५ रुपये भावाने कंपनी शेअर खरेदी (बायबॅक) करणार आहे. मागील दोन वर्षांतील हे पहिले बायबॅक आहे. हा कंपनीच्या चांगल्या कामगिरीचा संकेत असून, कंपनीकडे भरपूर रोख गंगाजळी (रिझर्व्ह) आहे हे दिसते. त्याचप्रमाणे भागधारकांचा कंपनीमधील हिस्सा वाढतो आणि कालांतराने ‘अर्निंग पर शेअर’म्हणजेच एका शेअरमागची मिळकत सुद्धा वाढते.

विप्रो कंपनीने गुरुवारी, २७ एप्रिल रोजी बायबॅक जाहीर केले, त्यावेळी एका शेअरचा बाजारभाव ३७५ रुपये होता. बायबॅक जाहीर झाल्यावर शुक्रवारी हा शेअर साधारण तीन टक्के वर जाऊन ३८५ रुपयांवर बंद झाला. म्हणजेच बाजारभावापेक्षा यावर साधारणपणे १४ टक्के प्रीमियम मिळतो आहे. त्यामुळे काही लोकांचा असा ‘गैरसमज’ होण्याची शक्यता असते, की ते आज विप्रोचे कितीही शेअर ३८५ भावाला खरेदी करून लगेच, ४४५ रुपयांना बायबॅकसाठी देऊन, एका शेअरमागे ६० रुपयांचा नफा कमाऊ शकतील. (खरोखर तसे झाले असते, तर देशात आज ११.४४ कोटी नाही, तर ११४ कोटी डी-मॅट खाती असती.)

बायबॅकच्या पद्धती बायबॅकच्या दोन पद्धती असतात, एक टेंडर ऑफर आणि दुसरी खुला बाजार खरेदी. विप्रोचे हे बायबॅक हे टेंडर ऑफर पद्धतीने आहे, यामध्ये भागधारकांना बायबॅकसाठी शेअर पाठवण्याचा पर्याय असतो आणि यात सर्वसामान्य (रिटेल) गुंतवणूकदारांना थोडे झुकते माप मिळू शकते.

विप्रो या वेळेला एका शेअरला ४४५ रुपये या भावाने स्वतःचे ४.९१ टक्के अर्थात तब्बल २७ कोटी शेअर खरेदी करणार आहे. म्हणजेच एकूण बम्पर १२,००० कोटी रुपये. परंतु, २७ कोटींच्यावर शेअर बायबॅकसाठी आले, तर ते त्या प्रमाणात (रेशो) स्वीकारले जातात. यामध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के राखीव कोटा आहे. अर्थात, १८०० कोटी रुपयांचे ४ कोटी शेअर फक्त रिटेल गुंतवणूकदारांकडूनच खरेदी करण्यात येतील. रिटेल गुंतवणूकदार म्हणजे ज्यांच्याकडे विप्रोचे दोन लाख रुपयांपर्यंतचेच शेअर आहेत. बायबॅक किंमत ४४५ रुपये ठरविल्यामुळे, रिटेल विभागामध्ये येण्यासाठी, एका डिमॅट खात्यामध्ये विप्रोचे कमाल, ४४९ शेअर पाहिजेत. त्यावरील शेअरसाठी राखीव कोटा नाही.

गुंतवणूकदारांना किती फायदा होऊ शकतो?

या प्रश्नाचे उत्तर बायबॅकसाठी किती शेअर येतात त्यावर अवलंबून आहे. जितके जास्त शेअर येतील तेवढा फायदा कमी होत जाईल. रिटेल विभागासाठी १५ टक्के म्हणजेच चार कोटी शेअर हा कोटा राखीव आहे. मात्र, रिटेल विभागामधून, दुप्पट म्हणजे आठ कोटी शेअर बायबॅकसाठी आले तर, ५० टक्के रेशो होतो. अर्थात, तुमच्याकडील ४५० शेअरपैकी फक्त २२५ शेअर बायबॅकसाठी स्वीकारले जातील आणि २२५ शेअर तुमच्याकडे रहातील ज्याची किंमत बाजारभावाप्रमाणे वर-खाली होईल. या आधीच्या उदाहरणांचा विचार केला, तर असे दिसून येते, की बहुतांश भागधारकांना बायबॅकची तारीख, पद्धत आणि फायदे माहिती नसल्याने ते त्यांचे शेअर बायबॅसाठी पाठवत नाहीत, त्यामुळे उरलेल्या भागधारकांना फायदा होऊ शकतो.

तात्पर्य: ‘आयटी’विभागातील शेअर मागील दीड वर्षांत मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे योग्य किमतीत मिळत आहेत. कंपनी चांगली कामगिरी करीत आहे. त्यामुळे, वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन, रेकॉर्ड तारखेच्या आत ४४९किंवा त्याहून अधिक शेअरची खरेदी केली तर, ते बायबॅकसाठी द्यावेत आणि उरलेले शेअर ३ ते ४ वर्षे ठेवण्याची तयारी ठेवल्यास योग्य परतावा मिळू शकतो.

(लेखक ‘ए३एस’ फायनान्शिअल सोल्यूशन्सचे प्रवर्तक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()