Multibagger Stock: सुझलॉन एनर्जीला मिळाला 225 मेगाव्हॅटचा नवा प्रोजेक्ट, शेअर्समध्ये तुफान वाढ

Multibagger Stock: सुझलॉन तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील वेंगाईमंडलम आणि तुतीकोरीन जिल्ह्यातील ओट्टापीदारम इथे एव्हररिन्यू एनर्जीच्या साइटवर हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर (HLT) टॉवरसह 75 विंड टर्बाइन जनरेटर बसवणार आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
suzlon energy has secured new 225 mw wind energy order
suzlon energy has secured new 225 mw wind energy order Sakal
Updated on

Multibagger Stock: रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमधील कंपनी सुझलॉन एनर्जीने (Suzlon Energy) एव्हररिन्यू एनर्जीकडून (Everrenew Energy) 225 मेगावॅटची नवीन पवन ऊर्जा ऑर्डर मिळाली आहे.

सुझलॉन तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील वेंगाईमंडलम आणि तुतीकोरीन जिल्ह्यातील ओट्टापीदारम इथे एव्हररिन्यू एनर्जीच्या साइटवर हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर (HLT) टॉवरसह 75 विंड टर्बाइन जनरेटर बसवणार आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

या बातमीनंतर सुझलॉन एनर्जीचे शेअर्स सुमारे 2 टक्क्यांनी वाढले. हा शेअर बीएसईवर 38.80 रुपये आणि एनएसईवर 38.90 रुपयांच्या वाढीसह उघडला. यानंतर, शेअर दिवसभरात 2 टक्क्यांपर्यंत वाढला आणि बीएसईवर 39.49 रुपये आणि एनएसईवर 39.50 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला.

suzlon energy has secured new 225 mw wind energy order
Robert Kiyosaki: 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकावर 1 अब्ज डॉलरचे कर्ज; म्हणाले, मी दिवाळखोर झालो तर...

गेल्या एका वर्षात, सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना 277 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कराराचा एक भाग म्हणून, सुझलॉन पवन टर्बाइन (इक्विपमेंट सप्लाय) पुरवठा करेल आणि कमिशनिंगसह प्रोजेक्ट सुपरवाइज करेल.

या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज व्यावसायिक आणि औद्योगिक (सी आणि आय) ग्राहक विभागाला वापरली जाईल अशी माहिती सुझलॉन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेपी चालसानी यांनी दिली.

हा प्रकल्प सुमारे 1.85 लाख घरांना वीज पुरवू शकतो आणि दरवर्षी सुमारे 7.31 लाख टन CO2 उत्सर्जन रोखू शकतो.

suzlon energy has secured new 225 mw wind energy order
MS Dhoni: धोनीची करोडोंची फसवणूक, कॅप्टन कूलने दाखल केला FIR; काय आहे प्रकरण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.