Multibagger Stock: ऑर्डर मिळताच 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी; शेअर्स खरेदीसाठी लागली रांग

Suzlon Energy Share Price: कंपनीचे मार्केट कॅप बीएसईवर 51,727 कोटींवर पोहोचले आहे.
Suzlon Energy rises 3 percent on order for 100.8 MW wind power project
Suzlon Energy rises 3 percent on order for 100.8 MW wind power project Sakal
Updated on

Suzlon Energy Share Price: सुझलॉन एनर्जीच्या (Suzlon Energy) शेअरमध्ये शुक्रवारी प्रचंड वाढ दिसून आली. सुझलॉनला जागतिक युटिलिटी कंपनीकडून 100.8 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे. या बातमीनंतर गुंतवणूकदारांकडून शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी झाली. त्यामुळे हा शेअर 3 टक्क्यांहून अधिक वाढला. या वर्षी आतापर्यंत या शेअरने 250 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

या ऑर्डर अंतर्गत, सुझलॉन त्याच्या नवीन उत्पादन हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर (एचएलटी) टॉवरसह 3.15 मेगावॅट क्षमतेचे 32 विंड टर्बाइन जनरेटर (WTGs) इन्‍स्‍टॉल करेल. हा प्रकल्प गुजरातमध्ये असणार आहे. सुझलॉनच्या या प्रकल्पात सप्‍लाय, सुपरव्हिजन आणि कमिशनिंग यांचाही समावेश असेल. याशिवाय, कंपनी सुरू झाल्यानंतर ऑपरेशन आणि मेन्‍टेनंस सर्व्हिसेजही प्रदान करेल.

Suzlon Energy rises 3 percent on order for 100.8 MW wind power project
Post Office: पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना; 10 वर्षात तुमचे पैसे होतील दुप्पट, कसे ते जाणून घ्या

सुझलॉन एनर्जीचे शेअर्स यावर्षी मल्टीबॅगर ठरले आहेत. 2023 मध्ये आतापर्यंत 250 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांतील परतावा 160 टक्क्यांहून अधिक आहे. सध्या हा शेअर 37.35 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचे मार्केट कॅप बीएसईवर सुमारे 51,727 कोटींवर पोहोचले.

कंपनीने दुसऱ्या तिमाहीत (Q2FY24) 102.29 कोटींचा निव्वळ नफा कमावला, जो मागील वर्षी याच कालावधीत 56.47 कोटी होता. या तिमाहीत 34.99 कोटीचा अनपेक्षित तोटा होऊनही कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. कंपनीचा ऑपरेटिंग नफा 32.6 टक्क्यांनी वाढून 225 कोटी झाला आहे. एका वर्षापूर्वी तो 169.7 कोटी होता.

Suzlon Energy rises 3 percent on order for 100.8 MW wind power project
Agri Stocks: 'या' अ‍ॅग्रो कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, सलग दुसऱ्या दिवशी शेअर्समध्ये अपर सर्किट

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.