Swiggy IPO: जगभरात २०२० मध्ये आलेल्या कोरोना महासाथीच्या काळात ऑनलाइन सेवांना मोठी चालना मिळाली. ऑनलाइन आर्थिक व्यवहार वाढले त्याचप्रमाणे घरबसल्या भाजीपाला, अन्नधान्य, तयार खाद्यपदार्थ अशा अनेक सेवा मिळू लागल्या. अशा सेवा देणाऱ्या अनेक कंपन्याया काळात चांगल्याच वाढल्या.
यातीलच एक कंपनी म्हणजे घरपोच खाद्यपदार्थ सेवा (फूड डिलिव्हरी) देणारी ‘स्विगी’. या स्विगी कंपनीचा आयपीओ बुधवार (ता.६) ते शुक्रवार (ता. ८) दरम्यान प्राथमिक बाजारात विक्रीसाठी येत आहे. या आयपीओसाठी प्रतिशेअर ३७१ ते ३९० रुपये किंमतपट्टा जाहीर करण्यात आला असून, किरकोळ गुंतवणूकदारांना कमीतकमी ३८ (रु.१४,८२०), तर कमाल ४९४ शेअरसाठी (रु.१,९२,६६०) अर्ज करता येणार आहे.