Tata Group Share
Tata Group Sharesakal

Tata Group Share : टाटा ग्रुपची कंपनी देतेय प्रति शेअर 70 रुपये डिव्हिडेंड: रेकॉर्ड डेट 25 जून निश्चित

टाटा ग्रुपची कंपनी Tata Elxsi आपल्या शेअरहोल्डर्सना प्रति शेअर 70 रुपये डिव्हिडेंड देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट 25 जून निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्या शेअरहोल्डर्सची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये शेअर्सचे मालक म्हणून दिसतात ते डिव्हिडेंड प्राप्त करण्यास पात्र असतील.
Published on

टाटा ग्रुपची कंपनी Tata Elxsi आपल्या शेअरहोल्डर्सना प्रति शेअर 70 रुपये डिव्हिडेंड देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट 25 जून निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्या शेअरहोल्डर्सची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये शेअर्सचे मालक म्हणून दिसतात ते डिव्हिडेंड प्राप्त करण्यास पात्र असतील. कंपनी ऑटोमोटिव्ह, ब्रॉडकास्ट, कम्युनिकेशन्स, हेल्थकेअर आणि वाहतुकीसाठी डिझाइन आणि टेक्नोलॉजी सर्विसेज प्रदान करते.

Tata Elxsi च्या बोर्डाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी शेअरहोल्डर्सना 10 रुपये फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी 70 रुपये फायनल डिव्हिडेंड जाहीर केला होता. कंपनीच्या 35 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर शेअरहोल्डर्सची मान्यता घेतली जाईल, असेही सांगण्यात आले. ही बैठक 10 जुलैला होणार आहे.

Tata Elxsi चा जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत निव्वळ नफा वार्षिक 2.32 टक्क्यांनी घसरून 196.93 कोटी झाला. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत तो 201.5 कोटी होता. मार्च 2024 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल वर्षभरात 8 टक्क्यांनी वाढून 905.9 कोटीवर पोहोचला आहे, जो एका वर्षापूर्वी 837.91 कोटी होता. पुर्ण आर्थिक वर्ष 2024 साठी कंपनीचा निव्वळ नफा 11.9 टक्क्यांनी वाढून 1,048.7 कोटी झाला आहे. दरम्यान, ऑपरेशन्समधील महसूल 13 टक्क्यांनी वाढून 3,552.1 कोटी झाला आहे. मार्च 2024 च्या अखेरीस प्रमोटर्सकडे टाटा एल्क्सीमध्ये 43.92 टक्के हिस्सा होता. तर पब्लिक शेअरहोल्डर्सकडे 56.08 टक्के हिस्सा होता.

बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 21 जून रोजी 7123.20 रुपयांवर बंद झाली. त्याची मार्केट कॅप 44300 कोटी आहे. गेल्या 6 महिन्यांत शेअरची किंमत 18.5 टक्क्यांनी घसरली आहे. 3 महिन्यांत स्टॉक 7 टक्क्यांनी घसरला आहे. 18 डिसेंबर 2023 रोजी शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांक 9,191.10 ला स्पर्श केला होता. 4 जून 2024 रोजी 6,406.60 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक नोंदवला गेला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com