Tata Group IPO: कमाईची सुवर्णसंधी! टाटा शेअर बाजारात करणार धमाका; पुढील 2-3 वर्षात 8 IPO येण्याची शक्यता

Tata Group IPO: नोव्हेंबर 2023 मध्ये, टाटा समूहाने टाटा टेकचा IPO आणला होता. ज्याला बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या IPOच्या गॅपनंतर टाटा ग्रुप येत्या दोन ते तीन वर्षांत अनेक IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Tata Group plans to launch 8 IPOs in 2-3 years check details
Tata Group plans to launch 8 IPOs in 2-3 years check details Sakal
Updated on

Tata Group IPO: नोव्हेंबर 2023 मध्ये, टाटा समूहाने टाटा टेकचा IPO आणला होता. ज्याला बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या IPOच्या गॅपनंतर टाटा ग्रुप येत्या दोन ते तीन वर्षांत अनेक IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांच्या मते, भविष्यातील वाढीला चालना देणे आणि निवडक गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याचे पर्याय देणे हे यामागचे कारण आहे.

ते म्हणाले की, टाटा कॅपिटल, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी, बिगबास्केट, टाटा डिजिटल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, टाटा हाउसिंग आणि टाटा बॅटरीज या कंपन्या IPOच्या यादीत आहेत. टाटा समूहाला डिजिटल, रिटेल, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रांमध्ये विस्तार करायचा आहे. असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

Tata Group plans to launch 8 IPOs in 2-3 years check details
Layoffs in Argentina: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष करणार 70,000 सरकारी कर्मचाऱ्यांची कपात; काय आहे कारण?

टाटा टेकच्या आयपीओपूर्वी टाटा समूहाचा शेवटचा आयपीओ सुमारे 2 दशकांपूर्वी आला होता. हा टाटा समूहाची आयटी कंपनी TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा आयपीओ होता. TCS चा IPO जुलै 2004 मध्ये आला होता.

सध्या TCS ही भारतीय शेअर बाजारातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. TCS ही भारतातील दुसरी सर्वात मोठी शेअर बाजारातील लिस्ट कंपनी आहे. TCSच्या पुढे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे.

टाटा समूहाच्या आयपीओच्या बातम्यांमुळे समूहाच्या आधीच शेअर बाजारात लिस्ट असलेल्या कंपन्यांना फायदा होत आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर समूहाच्या विविध शेअरच्या किंमती 5 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. शेअर बाजारात लिस्ट असलेल्या कंपन्यांच्या बाबतीत टाटा समूह हा भारतातील सर्वात मोठा कॉर्पोरेट समूह आहे.

Tata Group plans to launch 8 IPOs in 2-3 years check details
Insurance: विमा खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! विमा पॉलिसी नियमांमध्ये केला बदल; ग्राहकांवर काय होणार परिणाम?

सध्या समूहाच्या लिस्ट कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. टाटा समूह हा भारतातील पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव समूह आहे ज्याचे मार्केट कॅप 30 लाख कोटींहून अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.