Tata Group Stock: टाटा ग्रुपच्या शेअरमध्ये 9 टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

कंपनीचे मार्केट कॅपिटल सुमारे 14,780 कोटी आहे.
Ratan Tata
Ratan TataSakal
Updated on

Tata Group Stock: टाटा ग्रुपची कंपनी तेजस नेटवर्क्सच्या (Tejas Networks) शेअर्सने बुधवारी एका वर्षातील नवीन उच्चांक गाठला. दिवसभरात कंपनीचे शेअर्स जवळपास 9 टक्क्यांनी वाढले आणि एनएसईवर 888.80 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले.

पण, नंतरच्या व्यापारात त्याचे शेअर्स किंचित घसरले आणि शेवटी 7.47% वाढून 873 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा कंपनी जून तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.

गेल्या 7 व्यावसायिक दिवसांमध्ये त्यात 24 टक्क्यांनी तेजी आली आहे. तेजस नेटवर्कचे मार्केट कॅपिटल सुमारे 14,780 कोटी आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 43.96% वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 77.75 टक्के परतावा दिला आहे.

टाटा ग्रुपची ही कंपनी ऑप्टिकल, ब्रॉडबँड आणि डेटा नेटवर्किंगशी संबंधित प्रॉडक्ट्स बनवणे आणि त्याची विक्री करण्याच्या व्यवसायात आहे. ही कंपनी जवळपास 75 देशांमधील दूरसंचार कंपन्या, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, युटिलिटीज, सिक्युरिटी आणि सरकारी संस्थांना आपले प्रॉडक्ट्स विकते.

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 21 जुलैला होणार असल्याची माहिती तेजस नेटवर्क्सने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या अधिसूचनेत दिली. या बैठकीत कंपनीच्या जून तिमाहीचे अनऑडिट केलेले निकाल विचारात घेऊन त्याला मान्यता दिली जाईल.

मार्च तिमाहीत तेजस नेटवर्कचे एकूण उत्पन्न 320.59 कोटी होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 140.86 कोटींवरून 127.59 टक्क्यांनी अधिक आहे.

Ratan Tata
Multibagger Stock: फॅन-वायर बनवणाऱ्या कंपनीमुळे गुंतवणूकदार मालामाल! आणखी वाढीचा तज्ज्ञांना विश्वास

त्याच वेळी, कंपनीचा निव्वळ तोटा मार्च तिमाहीत 11.47 कोटी रुपयांवर घसरला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 49.62 कोटी रुपये होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Ratan Tata
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.