Tata Group IPO: पैसे तयार ठेवा! टाटा टेकनंतर टाटा ग्रुप आणणार आणखी 3 कंपन्यांचे IPO

Tata Group Upcoming IPO: टाटा समूहाने 2023 मध्ये टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लॉन्च केला होता. टाटा समूह आता टाटा टेकचा आयपीओ लॉन्च करण्याचा विचार करत आहे. टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा टेक ही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) नंतर 19 वर्षात लिस्ट झालेली पहिली कंपनी होती.
Tata Group will launch IPO of 3 more companies tata sons tata play bigbasket
Tata Group will launch IPO of 3 more companies tata sons tata play bigbasketSakal
Updated on

Tata Group Upcoming IPO: IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठा टाटा समूह आणखी 3 IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाने 2023 मध्ये टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लॉन्च केला होता. टाटा समूह आता 3 आयपीओ लॉन्च करण्याचा विचार करत आहे. (Tata Group will launch IPO of 3 more companies tata sons tata play bigbasket)

टाटा समूहाचे आणखी 3 आयपीओ येतील

टाटा टेकच्या आयपीओमध्ये शेअर्स मिळवू न शकलेले अनेक गुंतवणूकदार आता टाटा समूहाकडून चांगल्या IPOची आतुरतेने वाट पाहत आहेत. टाटा समूह एक नव्हे तर तीन कंपन्यांचे IPO आणण्याच्या विचारात आहे. या तीन कंपन्यांची यादी जाणून घ्या.

टाटा सन्स

टाटा सन्स ही 150 अब्ज डॉलर असलेली टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. गेल्या वर्षी, सप्टेंबर 2023 मध्ये, RBI ने Tata Sons ला 'अपर-लेयर' NBFC म्हणून घोषीत केले होते, त्यामुळे कंपनीला नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

यासोबतच टाटा समूहाची होल्डिंग कंपनी 2 वर्षांत म्हणजेच सप्टेंबर 2025 पर्यंत लिस्ट करावी लागेल. टाटा सन्स 5 टक्के ऑफरसह सुमारे 55,000 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करू शकते.

Tata Group will launch IPO of 3 more companies tata sons tata play bigbasket
Budget 2024: अजित पवार उद्या अंतरिम अर्थसंकल्प मांडणार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

बिगबास्केट

टाटा डिजिटलचे ऑनलाइन किराणा दुकान, बिगबास्केट ही भारतातील स्टार्टअप कंपनी आहे. टाटा समूह बिगबास्केट 24 ते 36 महिन्यांत IPO लॉन्च करू शकतो.

टाटा प्ले

डिसेंबर 2022 मध्ये, टाटा प्ले, ज्याला पूर्वी टाटा स्काय म्हणून ओळखले जात होते. कंपनीने SEBI कडे IPO साठी अर्ज केला आहे. डायरेक्ट-टू-होम (DTH) प्लॅटफॉर्म 2,000-2,500 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करू शकतो.

Tata Group will launch IPO of 3 more companies tata sons tata play bigbasket
Wheat Production : गहू होणार स्वस्त, तर तूरडाळ महाग ; तुरीला अवकाळीचा फटका

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.