Tata Motors: डिमर्जरच्या निर्णयानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स विक्रमी उच्चांकांवर; ब्रोकरेजचा काय आहे अंदाज?

Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्सने आज मंगळवारी विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीच्या डिमर्जर योजनेच्या घोषणेनंतर शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. कंपनीने आपला व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे
Tata Motors
Tata Motors Sakal
Updated on

Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्सने आज मंगळवारी विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीच्या डिमर्जर योजनेच्या घोषणेनंतर शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. कंपनीने आपला व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे, कमर्शियल व्हेईकल (CV) आणि पॅसेंजर व्हेईकल (PV) या दोन विभागांमध्ये व्यवसाय असणार आहे.

आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी टाटा मोटर्सच्या शेअरने इतिहास रचला आणि पहिल्यांदाच 1000 रुपयांची पातळी ओलांडली. मंगळवारी व्यवहारादरम्यान, या शेअरची किंमत 987 रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत सुमारे 7 टक्क्यांनी वाढून 1055 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. हा देखील शेअरचा सर्वकालीन उच्चांक आहे.

डिमर्जरमुळे शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली असली तरी ब्रोकरेजची वेगवेगळी मते आहेत. नोमुराच्या मते, डिमर्जरचा मूल्यांकनावर लगेच परिणाम होण्याची शक्यता नाही. जग्वार लँड रोव्हर (JLR) आणि पॅसेंजर व्हेईकल (PV) यासह कंपनीची कमर्शियल व्हेईकल (CV) चांगली कामगिरी करत आहेत.

रिसर्च फर्मने म्हटले आहे की, मध्यम कालावधीत हे दोन व्यवसाय वेगळे केल्याने दोघांना अधिक स्वातंत्र्य मिळेल. टाटा मोटर्सच्या प्रत्येक शेअरसाठी, शेअरधारकांना नव्याने लिस्ट झालेल्या दोन्ही कंपन्यांमध्ये प्रत्येकी 1 शेअर मिळेल.

डायमेंशन कन्सल्टिंगचे व्यवस्थापकीय संचालक अजय श्रीवास्तव यांचे मत आहे की, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ही बातमी खूप चांगली आहे. ते म्हणाले, विभाजनानंतर या व्यवसायाची खरी किंमत आपल्याला पाहायला मिळेल.

Tata Motors
RBI Action: पेटीएम सारखी RBIची आणखी एक कारवाई; 'या' कंपनीवर गोल्ड लोन देण्यास घातली बंदी, शेअर्स 20 टक्के घसरले

जेपी मॉर्गन

लक्ष्य किंमत रु. 1,000 सह 'ओव्हरवेट' रेटिंग

टाटा मोटर्सचा कमर्शियल व्हेईकल व्यवसाय डिमर्जरनंतर अनेक पटींनी वाढू शकतो

पॅसेंजर व्हेईकल व्यवसायात अधिक सहकार्याची गरज आहे

नोमुरा

BUY रेटिंग कायम आहे

लक्ष्य किंमत रु. 1,057

बाजाराच्या मूल्यमापनानुसार कोणतेही त्वरित बदल होऊ शकत नाहीत

Tata Motors
Gold Rate Today: सोन्याने पार केला 65,000 रुपयांचा टप्पा; या किंमतीवर सोने खरेदी करावे का?

मोतीलाल ओसवाल

1,000 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह रेटिंग 'BUY' वरून NEUTRAL वर बदलले

दोन स्वतंत्र युनिट्समध्ये व्यवसाय विभागणे हे योग्य पाऊल आहे

PV विभागामध्ये FY25E/FY26E मध्ये 8.5% वाढीचा अंदाज आहे

CV विभागामध्ये FY25E/FY26E मध्ये 6% वाढीचा अंदाज आहे

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()