Tata Motors: टाटा मोटर्सचा (Tata Motors) शेअर सध्या दमदार परफॉर्म करत आहे. नुकताच हा शेअर 2.1 टक्क्यांनी वाढून 798 रुपयांवर पोहोचला आहे. ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्सच्या शेअर्सचे रेटिंग 'ओव्हरवेट' पर्यंत वाढवले आहे आणि त्याचे टारगेटही वाढवले आहे.
या बातमीनंतर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आणखी वाढ दिसून येत आहे. जेपी मॉर्गनने आता टाटा मोटर्सच्या स्टॉकसाठी 925 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. हे त्याच्या मागील टारगेटपेक्षा सुमारे 36 टक्क्यांनी जास्त आहे.
टाटा मोटर्सचे टारगेट वाढवण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांची ब्रिटिश उपकंपनी जग्वार लँड रोव्हरचे आर्थिक आकडे चांगले असल्याचे जेपी मॉर्गनच्या ऍनालिस्ट्सचे म्हणणे आहे. याशिवाय कंपनी आता व्हॉल्यूमऐवजी नफ्यावर भर देत आहे, ही चांगली गोष्ट आहे.
टाटा मोटर्सच्या विक्रीत डिसेंबरमध्ये वार्षिक 5 टक्के वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने डिसेंबरमध्ये एकूण 77,855 मोटारींची विक्री केली होती.
डिसेंबर महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 8 टक्क्यांनी वाढून 43,675 झाली. निफ्टी-50 मध्ये टाटा मोटर्स हा एकमेव स्टॉक होता ज्याची किंमत 2023 मध्ये दुप्पट झाली. वर्षाच्या शेवटी स्टॉकची किंमत नवीन उच्चांकाच्या जवळ पोहोचली होती.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.