Tata Motors Shares Fall: कंपनीच्या त्रैमासिक निकालानंतर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दीर्घकाळ सुरू असलेली घसरण थांबली आहे. टाटा मोटर्सच्या नफ्यात घट झाली असली तरी गुंतवणूकदारांनी कंपनीच्या आउटलुक बद्दल उत्साह दाखवला आहे. आज सकाळी किंचित घसरणीसह उघडल्यानंतर, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली आणि शेअर 3 टक्क्यांनी वाढला.