Tata Motors Stock Price: टाटा मोटर्सने आपल्या वाहनांवर आणि विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांवर आणि इतर प्रवासी कारवर सवलत जाहीर केली आहे. ही घोषणा करताच कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 975 रुपयांच्या पातळीवर आले. त्याशिवाय, विदेशी ब्रोकरेज हाऊस यूबीएसने टाटा मोटर्सचा स्टॉक विकण्याचा सल्ला दिल्याने शेअर्स कोसळण्यात आणखी भर पडली आहे.