Tata IPO: टाटा समूह आणणार देशातील सर्वात मोठा IPO? RBI च्या एका नियमाने रतन टाटांची वाढली चिंता

Tata Sons IPO: टाटा समूह लवकरच 55,000 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करू शकतो.
Tata IPO
Tata IPOSakal
Updated on

Tata Sons IPO: टाटा समूह लवकरच 55,000 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करू शकतो. देशात आतापर्यंत आलेल्या एलआयसीच्या 21,000 कोटी रुपयांच्या आणि पेटीएमच्या 18,300 कोटी रुपयांच्या आयपीओपेक्षा हा IPO अनेक पटींनी मोठा असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्णयामुळे टाटा समूह आता हा IPO लाँच करण्याच्या विचारात आहे.

रिझर्व्ह बँकेमुळे टाटा समूहाला IPO आणण्याची गरज का पडली?

आता टाटा समूहाकडून येणारा नवा IPO हा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचा असणार आहे. रिझर्व्ह बँकेने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांनुसार, रिझर्व्ह बँकेने टाटा सन्सला NBFC (Non-bank financial institution) च्या श्रेणीत टाकले आहे.

टाटा सन्स या श्रेणीत न जाण्यासाठी पर्याय शोधत आहे. या प्रकरणात सर्वात सोपा पर्याय म्हणजे शेअर बाजारात सूचीबद्ध होणे. टाटा सन्सने बाजारात सूचिबद्ध होण्याचा निर्णय घेतल्यास, त्यासाठी आयपीओ लाँच करावा लागेल.

Tata IPO
Aditya Birla Group: आदित्य बिर्ला ग्रुपची पेंट व्यवसायात एंन्ट्री होताच गुंतवणूकदार झाले मालामाल

आयपीओ इतका मोठा असू शकतो

सध्याच्या नियमांनुसार, टाटा सन्सला बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी आहे. म्हणजे टाटा सन्सला सप्टेंबर 2025 पूर्वी आयपीओ आणावा लागेल. सध्या टाटा सन्सचे मूल्य अंदाजे 11 लाख कोटी रुपये आहे.

आयपीओ आल्यास टाटा ट्रस्टसह विविध भागधारकांना त्यांचा शेअर 5 टक्क्यांनी कमी करावा लागेल. सध्या टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची सर्वाधिक 66 टक्के भागीदारी आहे. त्यानुसार 5 टक्के होल्डिंगसह IPO चे मूल्य सुमारे 55 हजार कोटी रुपये होते.

Tata IPO
Sourav Ganguly: क्रिकट सोडून 'या' क्षेत्रात सौरव गांगुली करणार बॅटिंग, केली मोठी घोषणा

हा विक्रम LICच्या नावावर आहे

आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत एवढ्या मोठ्या आकाराचा एकही IPO आलेला नाही. भारतीय बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO चा विक्रम सध्या विमा कंपनी LIC कडे आहे.

LIC ने गेल्या वर्षी 21 हजार कोटी रुपयांचा IPO आणला होता, जो भारतीय बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO होता. याआधी हा विक्रम पेटीएमच्या नावावर होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.