Tata Technologies IPO: टाटा समूहाची कंपनी 20 वर्षांनंतर IPO उघडणार आहे. कंपनीचा IPO आज 22 नोव्हेंबरपासून उघडेल आणि 24 नोव्हेंबरला बंद होईल. यापूर्वी टाटा समूहाचा IPO 2004 साली उघडण्यात आला होता, जो देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS चा होता. टाटा टेक्नॉलॉजीच्या इश्यूची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीला IPO च्या माध्यमातून 3042 कोटी रुपये उभे करायचे आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीजचा IPO
IPO तारीख: 22 ते 24 नोव्हेंबर
प्राइस बँड: रु 475-500/शेअर
इश्यू साइज: 3042.5 कोटी रुपये
लॉट साइज: 30 शेअर्स
किमान गुंतवणूक: रु 15,000
टाटा टेकचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलद्वारे लॉन्च केला जात आहे. टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-1 आणि अल्फा टीसी होल्डिंग या आयपीओमधील त्यांचे स्टेक विकत आहेत.
कंपनीने पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी 50 टक्के, गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी 15 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के राखीव ठेवले आहेत.
कंपनीने आपल्या भागधारकांसाठी 6,085,027 इक्विटी शेअर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी 2,028,342 इक्विटी शेअर्स राखीव ठेवले आहेत.
टाटा टेकच्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत 475 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. याद्वारे किरकोळ गुंतवणूकदार एका वेळी किमान 30 शेअर्स खरेदी करू शकतात. तुम्हाला किमान 15,000 रुपये गुंतवावे लागतील.
कंपनीच्या शेअर्सच्या वाटपाची तारीख 27 नोव्हेंबर 2023 अशी निश्चित करण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी BSE आणि NSE वर शेअर्स लिस्ट होतील.
टाटा टेक्नॉलॉजीच्या IPO मध्ये गुंतवणूक करावी का?
अनेक तज्ज्ञांनी टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यात कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहणार असल्याचे ते म्हणतात. अनेक अहवालानुसार टाटा टेक्नॉलॉजीज आता एरोस्पेस क्षेत्रात विस्तार करण्याची योजना आखत आहे. अशा स्थितीत कंपनीची वाढ अपेक्षित आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.