Tata Technologies IPO: गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी! 20 वर्षांनंतर येणार टाटा कंपनीचा IPO, SEBI ची मंजूरी

जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर मोठी संधी आहे.
Tata Technologies IPO
Tata Technologies IPOSakal
Updated on

Tata Technologies IPO: जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर मोठी संधी आहे. कारण Tata Technologies IPO चा मार्ग मोकळा झाला आहे. बाजार नियामक सेबीने टाटा समूहाच्या कंपनीच्या IPO चे अर्ज मंजूर केला आहे.

Tata Technologies ने IPO साठी गेल्या मार्च महिन्यात अर्ज केला होता. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित असेल. टाटा समूहाच्या एका कंपनीचा IPO 20 वर्षांनंतर येणार आहे. हे देखील महत्त्वाचे आहे.

यापूर्वी, टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा IPO जुलै 2004 मध्ये आला होता. शेअर बाजार गुंतवणूकदार या IPO ची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. टाटा समूहाच्या या कंपनीचा आयपीओ अनेक अर्थांनी खास आहे.

9.57 कोटी शेअर्स विकणार

ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. ड्राफ्ट पेपरनुसार, कंपनी (टाटा टेक्नॉलॉजीज) या IPO द्वारे सुमारे 9.57 कोटी शेअर्स विकणार आहे. यापैकी टाटा मोटर्स 8.11 कोटी रुपयांचा हिस्सा विकणार आहे.

उर्वरित शेअर्समध्ये, अल्फा टीसी होल्डिंग्स 97.2 लाख शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 1 त्याच्या होल्डिंगमधून 48.6 लाख शेअर्सची विक्री करेल.

Tata Technologies IPO
EPFOचा दिलासा! हायर पेन्शनच्या अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ; जाणून घ्या काय आहे नवी तारीख

IPO 2004 साली आला होता

यापूर्वी, टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा आयपीओ 2004 साली आला होता. आज TCS ही देशातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. टाटा टेक्नोलॉजीज डिजिटल, अभियांत्रिकी आणि तांत्रिक सेवा क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे.

या आयटी स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. दलाल स्ट्रीटच्या सर्वात मोठ्या शेअर्लपैकी हा एक शेअर आहे. या कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 11.7 लाख कोटी रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Tata Technologies IPO
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.