Tax on Gifted Stocks: तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेअर्स गिफ्ट केलेत का? तर भरावा लागेल टॅक्स, काय आहे नियम?

Tax on Gifted Stocks: तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा कुटुंबातील सदस्याला शेअर्स गिफ्ट केले आहेत.
Income Tax
Income Tax Sakal
Updated on

Tax on Gifted Stocks: बदलत्या काळानुसार लोकांची गुंतवणूक करण्याची पद्धत बदलली आहे. अधिक परतावा मिळविण्यासाठी लोक आता शेअर बाजाराकडे वळू लागले आहेत. वाढलेल्या जागरुकतेचा परिणाम असा आहे की लोकांनी आता आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर्स गिफ्ट करायला सुरुवात केली आहे.

तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा कुटुंबातील सदस्याला शेअर्स गिफ्ट केले असतील किंवा तसे करण्याची तयारी करत आहात. चला तर मग जाणून घेऊया की शेअर्स गिफ्ट करण्याच्या बाबतीत कर नियम काय आहेत.

50,000 रुपयांपर्यंतच्या गिफ्ट वस्तूंवर कर नाही

प्राप्तिकर कायद्यानुसार, एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंना करातून सूट मिळते. सोप्या भाषेत सांगायचे तर, एका वर्षात मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचे एकूण मूल्य 50,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास, कोणताही कर आकारला जाणार नाही.

50,000 रुपयांपेक्षा जास्त गिफ्ट वस्तू मिळाल्यावर, गिफ्ट वस्तूंच्या एकूण रकमेवर कर भरावा लागेल. ज्याला गिफ्ट वस्तू मिळते त्याला कर भरावा लागतो. पैसे, मालमत्ता, वाहन, दागिने किंवा शेअर्ससह इतर वस्तू गिफ्ट म्हणून दिली जाऊ शकते.

Income Tax
काय आहे CAG? ज्यामुळे काँग्रेसची सत्ता गेली अन् मोदींचा उदय झाला

'या' लोकांना भेटवस्तू करमुक्त आहे

गिफ्ट वस्तूवरील कर कोण देत आहे यावर देखील कर अवलंबून असतो. आयकर कायद्यांतर्गत, 'नातेवाईक' श्रेणीतील व्यक्तींकडून मिळालेल्या गिफ्ट वस्तूंवर कोणताही कर नाही, गिफ्ट वस्तूचे मूल्य कितीही असले तरी यावर कर लागत नाही.

याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला शेअर्स गिफ्ट केले तर त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही. पत्नीशिवाय भाऊ-बहीण, आई-वडील, पत्नीचे आई-वडील असे इतर लोकही 'नातेवाईक' या वर्गात येतात. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवरही कर नाही.

'या' प्रकरणांमध्ये कर भरावा लागेल

कुटुंबातील सदस्यांना शेअर्स गिफ्ट केल्यास कर लागू होणार नाही. काही प्रकरणांमध्ये येथे देखील कर आकारला जाईल. उदाहरणार्थ, ज्यांना तुम्ही गिफ्ट केले त्यांनी शेअर्स विकले किंवा लाभांश मिळवला तर निश्चितपणे कर आकारला जाईल. तुम्ही हे शेअर्स विकत घेतले असून ते एखाद्याला दिले असल्याने, आयकर कायद्याच्या कलम 64 अंतर्गत क्लबिंग तरतुदी लागू होतील.

Income Tax
RBI : कर्जदारांना स्थिर व्याजदराचा पर्याय द्या; ‘रिझर्व्ह बँके’चे अन्य बँका, वित्तसंस्थांना निर्देश

असा असेल हिशोब

होल्डिंग कालावधीनुसार कर लागू होईल. जर लिस्टिंग झालेले शेअर्स खरेदीच्या तारखेपासून 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ठेवल्यानंतर विकले गेले, तर नफ्यावर 15 टक्के दराने शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (STCG) भरावा लागेल.

12 महिन्यांनंतर विकल्यास, नफा दीर्घकालीन भांडवली नफा मानला जाईल. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नफ्यावर 10% कर आकारला जाईल. दोन्ही प्रकरणांमध्ये सेस आणि अधिभार देखील भरावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.