मेडिकल इक्विपमेंट बनवणारी कंपनी अप्रमेय इंजिनिअरिंगचा (Aprameya Engineering) आयपीओ आजपासून अर्थात 25 जुलैपासून खुला झाला आहे. या आयपीओमध्ये 29 जुलैपर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत. शेअर्सची लिस्टींग 1 ऑगस्टला होऊ शकते. हा आयपीओ 29.23 कोटीचा बुक बिल्ट इश्यू आहे. हा इश्यू 50.4 लाख शेअर्सचा पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे.
आयपीओसाठीचा प्राइस बँड 56 ते 58 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. आयपीओसाठीची किमान लॉट साईज 2000 शेअर्सची आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूकीची रक्कम 1.16 लाख रुपये आहे.
तर एचएनआयसाठी किमान लॉट साईज गुंतवणूक 2 लॉट्सची (4,000 शेअर्स) आहे, ज्याची रक्कम 2.32 लाख रुपये आहे. हेम सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड हे आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.
कंपनीचे प्रमोटर सौरभ किशोरभाई भट्ट आणि चेतन मोहन जोशी आहेत. सप्टेंबर 2003 मध्ये स्थापित, अप्रमेय इंजिनिअरिंग लिमिटेड रुग्णालये आणि वैद्यकीय सेवा केंद्रांमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट्स (ICU),
नवजात अतिदक्षता युनिट्स (NICU), बालरोग अतिदक्षता युनिट्स (PICU), ऑपरेशन थिएटर्स आणि प्रीफेब्रिकेटेड स्ट्रक्चर वॉर्ड्स स्थापित आणि देखरेख करते. ते टर्नकी आधारावर या सेवा प्रदान करतात आणि खासगी रुग्णालये, सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांना आरोग्य सेवा आणि निदान उपकरणेही प्रदान करतात.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.