Tata Group: टाटा कंपनीच्या शेअरने रचला इतिहास, गुंतवणूकदार झाले मालामाल, काय आहे कंपनीचा प्लॅन?

Tata Group: तीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना
Titan share price hits all-time high, market capitalization surpasses rs 3 lakh crore mark
Titan share price hits all-time high, market capitalization surpasses rs 3 lakh crore mark Sakal
Updated on

Tata Group: टाटा समूहाची कंपनी टायटनने मंगळवारी इतिहास रचला आहे. 3 ट्रिलियन मार्केट कॅपिटलायझेशन (मार्केट कॅप) क्लबमध्ये सामील होणारी टाटा समूहाची दुसरी कंपनी ठरली आहे. या कंपनीच्या शेअरने मंगळवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह 3,400 रुपयांचा नवा उच्चांक गाठला.

टाटा समूहाची दुसरी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आहे. ही कंपनी 12.95 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह दुसऱ्या स्थानावर आहे.

तीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना

टायटन कंपनी पुढील पाच वर्षांत अभियांत्रिकी, डिझाइन, लक्झरी, डिजिटल, डेटा विश्लेषण, विपणन आणि विक्री या क्षेत्रांमध्ये 3,000 हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. कंपनी डेटा विश्लेषण, सायबर सुरक्षा, उत्पादन व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग आणि इतर कौशल्ये यासारख्या क्षेत्रांसाठी कुशल कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे.

Titan share price hits all-time high, market capitalization surpasses rs 3 lakh crore mark
भारतातील सर्वात महागडा घटस्फोट; नवाज मोदींनी रेमंडच्या मालकाकडे केली 'इतक्या' कोटींची मागणी

टायटन कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही पुढील पाच वर्षात 1,00,000 कोटींच्या व्यवसायाचा प्रवास सुरू करत आहोत. येत्या पाच वर्षांत आम्ही 3,000 नवीन कर्मचारी नियुक्त करणार आहोत.'' सध्या कंपनीचे 60 टक्के कर्मचारी महानगरांमध्ये कार्यरत आहेत. तर 40 टक्के दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये आहेत.

ज्वेलरी आणि घड्याळ निर्मात्या टायटन कंपनीने सप्टेंबर तिमाहीत 940 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. हे मागील वर्षीच्या तिमाहीत 857 कोटींवरून 9.7% ने वाढले आहे. सप्टेंबर तिमाहीत महसूल 33.6% वाढून 11,660 कोटी झाला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत 8,730 कोटी होता.

Titan share price hits all-time high, market capitalization surpasses rs 3 lakh crore mark
Byju: बायजूवर 9,000 कोटींच्या हेराफेरीचा आरोप? जाणून घ्या काय आहे प्रकरण

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.