Top 10 Shares Before Opening Share Market : सोमवारी बाजारात सलग सहाव्या दिवशी वाढ दिसून आली. या तेजीत रिअल इस्टेट शेअर्सचा सर्वाधिक वाटा आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 13.54 अंकांनी अर्थात 0.02 टक्क्यांनी वाढून 59846.51 वर आणि निफ्टी 24.90 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी वाढून 17624 वर बंद झाला.
बाजाराची सुरुवात वाढीसह झाली आणि जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसा सेन्सेक्स 60000 च्या जवळ तर निफ्टी 17700 च्या जवळ पोहोचला. पण शेवटच्या सत्रात प्रॉफिट बुकींग झाली; बाजाराने सर्व नफा गमावत फ्लॅट बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
तांत्रिकदृष्ट्या निफ्टीने एक लहान इनव्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक तयार केली आहे जी बुल्स आणि बियर्समधील अनिश्चितता दर्शवते असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. तात्पुरत्या ओव्हरबोट स्थितीमुळे वरच्या स्तरांवर प्रॉफीट बुकिंग पाहू शकतो. निफ्टीला आता 17525-17550 च्या रेंजमध्ये वरच्या बाजूने रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे. आणि खाली 17450-17500 वर सपोर्ट आहे.
निफ्टीमध्ये सोमवारी सकारात्मक गती कायम राहिली आणि सलग सहाव्या दिवशी तो वाढीसह बंद झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. डेली चार्ट पाहता, निफ्टीमध्ये 17680 - 17700 च्या आसपास विक्री दिसत आहे, जो त्याचा रझिस्टंस झोन बनला आहे. निफ्टी आता त्याच्या रझिस्टंसच्या जवळ आहे. शिवाय त्याचा मोमेंटमही हरवत चालला आहे.
अशा स्थितीत शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीमध्ये कंसोलिडेशन दिसून येते. निफ्टीला आता 17550-17500 वर सपोर्ट दिसत आहे. तर, 17680-17700 च्या झोनमध्ये वरच्या बाजूला रझिस्टंस दिसून येतो. एकूणच, निफ्टीमध्ये अजूनही चढ-उताराची शक्यता आहे.
आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?
'टाटा मोटर्स (TATAMOTORS)
ओएनजीसी (ONGC)
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
ग्रासिम (GRASIM)
विप्रो (WIPRO)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
एमफॅसिस (MPHASIS)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.