IPO News: टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचा IPO 10 ऑगस्टला होणार खुला, गुंतवणुकीची मोठी संधी

TVS Supply Chain Solutions IPO: 10 ते 14 ऑगस्टपर्यंत हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल.
IPO
IPOSakal
Updated on

TVS Supply Chain Solutions IPO: टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सच्या (TVS Supply Chain Solutions) आयपीओचा प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. 10 ते 14 ऑगस्टपर्यंत हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल.

187-197 रुपयांच्या प्राइस बँड आणि 76 शेअर्सच्या लॉटसह इश्यू निश्चित करण्यात आला आहे. इश्यूच्या 75 टक्के पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB), 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि 10 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.

आयपीओनंतर 18 ऑगस्टला शेअर्सचे ऍलॉटमेंट होईल. आयपीओचे रजिस्ट्रार लिंक इनटाईम आहे. यानंतर, 24 ऑगस्टला बीएसई आणि एनएसईमध्ये शेअर्स लिस्ट केले जातील.

इश्यू अंतर्गत, 600 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, ऑफर फॉर सेल (OFS) विंडो अंतर्गत 1,42,13,198 शेअर्स विकले जातील. शेअर्सचे फेस व्हॅल्यू 1 रुपया आहे.

नवीन शेअर्सच्या माध्यमातून उभारलेल्या पैशाचा वापर कंपनी आणि तिच्या उपकंपन्या टीव्हीएस एलआय युके आणि टीव्हीएस सीएससी सिंगापूर यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाईल. याशिवाय हा पैसा सामान्य कॉर्पोरेट कामांसाठीही वापरला जाईल.

आयपीओअंतर्गत, ओमेगा टीसी होल्डिंग्स पीटीआय 1.07 कोटी, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस 9.84 लाख, सरगुनाराज रविचंद्रन 5.80 लाख, अँड्र्यू जोन्स 4 लाख, रामलिंगन शंकर 3.15 लाख आणि इथिराजन बालाजी 2.5 लाख शेअर्स विकणार आहेत.

IPO
Multibagger Stocks: 8 रुपयांच्या शेअरने बनवले कोट्यधीश, पण आता तज्ज्ञांचा शेअर्स विकण्याचा सल्ला, काय आहे कारण?

टीव्हीएस सप्लाय चेन ही टीव्हीएस ग्रुपची कंपनी आहे जी आता टीव्हीएस मोबिलिटी ग्रुप आहे. 16 वर्षांहून अधिक काळ, ते देशातील तसेच जागतिक बाजारपेठेतील अनेक उद्योगांची सप्लाय चेन मॅनेज करत आहे.

यात चार बिझनेस वर्टिकल आहेत, ज्यात सप्लाय चेन सोल्युशन्स, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो डीलरशिप आणि आफ्टरमार्केट सेल्स अँड सर्व्हिसेसचा समावेश आहे.

IPO
IPO News: पिरॅमिड टेक्नोप्लास्टचा IPO 18 ऑगस्टला होणार खुला, कंपनीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.