बालकृष्ण इंडस्ट्रीजचे (Balkrishna Industries) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना लाँग टर्ममध्ये दमदार नफा मिळवून दिला आहे. सध्या हे शेअर्स 1955.40 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
सध्या या शेअर्समध्ये घसरण सुरु असतानाही मार्केट एक्सपर्ट यात गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे सांगत आहेत. (Tyre Company Balkrishna Industries shares best for investment)
बाळकृष्ण इंडस्ट्रीजसाठी डिसेंबर 2022 ची तिमाही खास राहिली नाही. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मध्ये, कंपनीचा कंसालिडेटेड नेट प्रॉफीट 68 टक्क्यांनी घसरून 108.38 कोटी रुपये झाले, पण महसूल 6 टक्क्यांच्या माफक दराने वाढून 2165.57 कोटी रुपये झाला. बाळकृष्ण ऑफ-हायवे टायर्स बनवतात ज्यांची निर्यात जानेवारी 2023 मध्ये मंदावलेली होती.
जगभरातील कंटेनरचा तुटवडा आणि गेल्या वर्षी 2022 च्या सुरुवातीला कंटेनरच्या किमतीत पाच पटीने वाढ झाल्याने त्याच्या व्यवसायावर परिणाम झाला. डिस्ट्रीब्यूटर्स मार्च-जुलै 2022 मध्ये किरकोळ मागणीपेक्षा सुमारे 10% जास्त स्टॉक केला, जो ऑगस्ट 2022 पासून काढला जाऊ लागला.
बालकृष्ण इंडस्ट्रीचा शेअर 2 एप्रिल 2009 रोजी अवघ्या 15.94 रुपयांना होता आणि आता तो 12151 टक्क्यांनी वाढून 1952.75 रुपयांवर आहे. याचाच अर्थ त्याने चौदा वर्षांत अवघ्या 82 हजारांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले.
गेल्या वर्षी 3 ऑगस्ट 2022 रोजी हे शेअर्स 2451 रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर होते. अशात ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने 2,378 च्या टारगेटसह बाय रेटिंग कायम ठेवली आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.