Kotak Mahindra Bank: उदय कोटक यांंनी राजीनामा देताच आज बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, काय झाला परिणाम?

Kotak Mahindra Bank Stocks: उदय कोटक यांनी CEO पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्स घसरले आहेत.
Uday Kotak resigns as CEO of Kotak Mahindra Bank,  big fall in the bank's shares today
Uday Kotak resigns as CEO of Kotak Mahindra Bank, big fall in the bank's shares today Sakal
Updated on

Kotak Mahindra Bank Stocks: 20 वर्षे कोटक महिंद्राच्या बँकेचे CEO राहिल्यानंतर उदय कोटक यांनी CEO आणि MD पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ या वर्षाच्या अखेरपर्यंतचा होता परंतु वैयक्तिक कारणांमुळे चार महिने अगोदरच या जबाबदारीतून मुक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोटक महिंद्रा बँकेला 2003 मध्ये परवाना मिळाला आणि आज ती देशातील चौथी सर्वात मोठी बँक आहे. उदय कोटक यांची बँकेतील हिस्सेदारी 26 टक्के आहे, ज्याचे सध्याचे मूल्य 3.5 लाख कोटी रुपये आहे.

उदय कोटक यांनी CEO पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज (सोमवारी) कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरची किंमत घसरली आहे. सकाळी 10.54 वाजता कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरच्या किंमतीत 0.62 टक्क्यांनी घसरण झाली, बँकेचा शेअर 1,769.56 वर व्यवहार करत होता.

1 सप्टेंबर रोजी, कोटक यांनी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आणि कोटक महिंद्रा बँकेचे सह व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता यांना जबाबदारी देण्यात आली. दीपक गुप्ता 31 डिसेंबरपर्यंत एमडी आणि सीईओची कर्तव्ये पार पाडतील.

Uday Kotak resigns as CEO of Kotak Mahindra Bank,  big fall in the bank's shares today
Ratnaveer IPO: आजपासून रत्नवीर प्रिसिजन IPO होणार खुला, गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती जाणून घ्या

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने नमूद केले की कोटक महिंद्रा बँकेने गेल्या काही वर्षांत स्थिर कामगिरी केली आहे, तिचे RoE (Return on equity) हळूहळू 14% पेक्षा जास्त सुधारत आहे.

प्रति शेअर 2,000 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह स्टॉकवर रेटिंग कायम ठेवले. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीचा असा विश्वास आहे की कोटक महिंद्रा बँक बाजारातील संधी मिळविण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे.

Uday Kotak resigns as CEO of Kotak Mahindra Bank,  big fall in the bank's shares today
SBI Bank: ग्राहकांच्या संमतीशिवाय खात्यातून पैसे काढल्याचा SBI वर आरोप, बँकेने दिले स्पष्टीकरण

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.