Stock Market : फक्त २ दिवसांत बुडाले ३८ लाख कोटी; शेअरहोल्डर्सचा कपाळाला हात

एमएससीआय आशिया पॅसिफिक फायनान्शिअल इंडेक्समध्ये २.७ टक्क्यांची घट दिसत असून ही २९ नोव्हेंबरनंतरची सर्वाधिक घट आहे.
Stock Market
Stock Marketgoogle
Updated on

मुंबई : अमेरिकेतील बाजार कोसळल्याने ग्लोबल फायनान्शिअल स्टॉक्सची अवस्था सध्या वाईट आहे. केवळ दोनच दिवसांत ग्लोबल फायनान्शिअल स्टॉक्सच्या किंमतीत ४६५ अब्ज डॉलर्सची म्हणजेच ३८ लाख ३० हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.

सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोर ठरल्यानंतर जगभरातील भागधारकांनी आपले समभाग मागे घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, ग्लोबल फायनान्शिअल स्टॉक्समध्ये मंगळवारी मोठी घसरण दिसून आली. (US stock market dashed global financial stocks lost 465 billion dollers in 2 days)  हेही वाचा - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Stock Market
Women's Day : सावित्रीबाईंच्याही आधी एका अमेरिकी महिलेने सुरू केली होती मुलींची शाळा

एमएससीआय आशिया पॅसिफिक फायनान्शिअल इंडेक्समध्ये २.७ टक्क्यांची घट दिसत असून ही २९ नोव्हेंबरनंतरची सर्वाधिक घट आहे. जपानच्या मित्सुबिशी यूएफजे फायनान्शिअल ग्रुपमध्ये ८ टक्क्यांची घट दिसून येत आहे.

दक्षिण कोरियाच्या हाना फायनान्शिअल ग्रुपमध्ये ४.७ टक्क्यांची घट झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या एएनझेड ग्रुप होल्डिंग्ज लिमिटेडचे शेअर्स २.८ टक्क्यांनी घसरले आहेत.

एमएससीआय वर्ल्ड फायनान्शिअल इंडेक्स आणि एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स फायनान्शिअल इंडेक्समध्ये सहभागी असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य शुक्रवारपासून ४६५ अब्ज डॉलरने घसरले आहे.

Stock Market
Women's Day Special : कॉलराने कसा घेतला होता मुलींच्या पहिल्या शाळेचा बळी ?

अमेरिकेतील प्रादेशिक बँकांनाही सोमवारी मोठा झटका बसला. केबीडब्ल्यू रिजनल बँकींग इंडेक्समध्ये ७.७ टक्क्यांची घट झाली आहे. ही २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण आहे.

फर्स्ट रिपब्लिक बँकचे शेअर्स ३ सत्रांमध्ये ७३ टक्क्यांनी पडले आहेत. ही बँक वर्ल्ड फायनान्शिअल इंडेक्समध्ये टॉप लूजर आहे. मूडीजने बँकेच्या सर्व टॉप रेटिंग्जना डाऊनग्रेड केले आहे.

युरोपियन बँका आणि इन्शॉरन्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. क्रेडीट सुइस एजी ग्रुपचे शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले आहेत. याच्या बॉन्ड्सच्या शेअर्सची कॉस्ट ऑल टाइम हायवर पोहोचली आहे. जपानच्या फायनान्शिअल स्टॉक्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.

सूचना - येथे फक्त शेअर्सच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()