Bank IPO: 12 जुलैला खुला होणार उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO, तुम्ही तयार आहात ना?

आयपीओ 12 जुलैला सुरु होऊन 14 जुलैला बंद होईल.
Utkarsh Small Finance Bank IPO
Utkarsh Small Finance Bank IPOSakal
Updated on

Utkarsh Small Finance Bank IPO: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा (Utkarsh Small Finance Bank) आयपीओ 12 जुलैला खुला होणार आहे. त्यांनी आपल्या 500 कोटीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी (IPO) 23-25 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.

कंपनीचे मुख्यालय वाराणसीत आहे. हा आयपीओ 12 जुलैला सुरु होऊन 14 जुलैला बंद होईल. एँकर गुंतवणुकदारांना 11 जुलैला बोली लावता येईल. कंपनीचा 500 कोटीचा आयपीओ (IPO) पुर्णतः फ्रेश इक्विटी शेअर्सवर आधारित असेल.

या आयपीओतून जी रक्कम जमा होईल त्यातून ही स्मॉल फायनान्स बँक आपल्या टियर-1 कॅपिटल बेसला मजबूत करण्यासाठी वापरणार आहे.

लॉट साइज

गुंतवणूकदार कमीतकमी 600 शेअर्ससाठी बोली लावू शततात. यानंतर 600 इक्विटी शेअर्सच्या मल्टीपलमध्ये बोली लावू शकतील. अपर प्राइस बँडचा विचार केल्यास एका लॉट साईजसाठी कमीत कमी 15 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities) आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी (Kotak Mahindra Capital Company) या इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

आयपीओ लिस्ट झाल्यानंतर उत्कर्ष (Utkarsh) इतर स्मॉल फायनान्स बँक्स जशा की ए यू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank), इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (Equitas Small Finance Bank), उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) आणि सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकच्या (Suryoday Small Finance Bank) लिस्टमध्ये समाविष्ट होईल, ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्डेट आहेत.

Utkarsh Small Finance Bank IPO
BSE : बीएसई ने साजरा केला १४९ वा स्थापना दिन; नवीन लोगोचे अनावरण

बँकेचा ग्रॉस लोन पोर्टफोलियो 31 मार्च, 2023 रोजी वाढून 13,957.11 कोटीवर पोहोचला आहे, जो 31 मार्च, 2021 पर्यंत 8,415.66 कोटी होता.

याशिवाय बँकेचे लोन डिस्बर्समेंट 2022-23 मध्ये वाढून 12,442.89 कोटी झाले, तेच 2020-21 मध्ये 5,914.01 कोटी होते. या कालावधीत बँकेची जमा 7,507.57 कोटीवरुन वाढत 13,710.14 कोटी झाली.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Utkarsh Small Finance Bank IPO
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.