Vaibhav Jewellers IPO: लवकरच येतोय वैभव ज्वेलर्सचा आयपीओ, तुम्ही तयार आहात ना?

Vaibhav Jewellers IPO: सप्टेंबर महिन्यातील हा अकरावा आयपीओ असेल.
Vaibhav Jewellers IPO
Vaibhav Jewellers IPOSakal
Updated on

Vaibhav Jewellers IPO: आंध्र प्रदेशातील कंपनी मनोज वैभव जेम्स एन ज्वेलर्सचा (Vaibhav Gems N Jewellers) आयपीओ 22 सप्टेंबरला खुला होणार आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यातील हा अकरावा आयपीओ असेल.

या आयपीओमध्ये 210 कोटीचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. तसेच, प्रमोटर ग्रांधी भारत मल्लिका रत्न कुमारीच्या (एचयुएफ) वतीने 28 लाख शेअर्स ऑफर-फॉर-सेलद्वारे (OFS) विकले जातील.

आयपीओच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमधील आयपीओ शेड्युलनुसार या आयपीओमध्ये 26 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ एक दिवस आधी म्हणजेच 21 सप्टेंबरला खुला होईल.

वैभव ज्वेलर्स हा दक्षिण भारतातील आघाडीचा प्रादेशिक ज्वेलरी ब्रँड आहे. भारत मल्लिकारत्न कुमारी ग्रांधी आणि त्यांची मुलगी ग्रांधी साई कीर्तना यांच्याकडे याचे नेतृत्व आहे. वैभव ज्वेलर्सचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील 8 शहरे आणि 2 शहरांमध्ये 13 शोरूम आहेत.

कंपनीने क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी अर्धा भाग राखून ठेवला आहे, ज्यापैकी 60 टक्क्यांपर्यंत अँकर गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, इश्यू आकाराच्या 15 टक्के रक्कम नॉन-इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्ससाठी राखीव आहे आणि बाकी 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

Vaibhav Jewellers IPO
Amazon: 2,000 च्या नोटेबाबत अ‍ॅमेझॉनचा मोठा निर्णय, 19 सप्टेंबरपासून लागू होणार नवीन नियम

आयपीओ अंतर्गत फ्रेश इक्विटी शेअर्समधून मिळणारे पैसे प्रामुख्याने 8 नवीन शोरूम्स उभारण्यासाठी वापरले जातील. या शोरूम्सवर 172 कोटी रुपये खर्च होईल असा अंदाज आहे. यानंतर, फ्रेश इश्यूमधील उरलेले पैसे सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरले जातील.

Vaibhav Jewellers IPO
Adani Group: G-20 परिषद संपली अन् गौतम अदानींना लागला जॅकपॉट, मिळाला मोठा प्रोजेक्ट! काय आहे मास्टर प्लॅन?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.