Vedanta Shares: उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता रिसोर्सेस या कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाच्या समस्यांचा सामना करत आहे. आता मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने कंपनीचे क्रेडिट रेटिंग कमी केले आहे.
कंपनीच्या कर्ज परतफेडीबाबत शंका व्यक्त केली जात आहे त्यामुळे कंपनीचे क्रेडिट रेटिंग कमी केले आहे. एवढेच नाही तर मूडीजने कंपनीबाबत आपला नकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे.
त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसत आहे. वेदांता लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली. बुधवारी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 210 रुपयांवर पोहोचले. वेदांताचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत.
कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने कमी केलेल्या रेटिंगमुळे झाली. वेदांतावरील कर्जाचा दबाव सतत वाढत आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने वेदांता रिसोर्सेसचे रेटिंग Caa1 वरून Caa2 वर कमी केले आहे.
या वर्षात कंपनीचे शेअर्स 33% घसरले
वेदांता लिमिटेडचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. या वर्षी आतापर्यंत वेदांताचे शेअर्स 33% घसरले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी वेदांता लिमिटेडचे शेअर्स 316.10 रुपये होते.
27 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 210 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 6 महिन्यांत वेदांताच्या शेअर्समध्ये 23% ची घसरण झाली आहे.
जानेवारीत 8,300 कोटी रुपये द्यावे लागणार
वेदांता रिसोर्सेस लिमिटेडचे एक अब्ज डॉलर (सुमारे 8,300 कोटी रुपये) किंमतीचे रोखे जानेवारी 2024 मध्येच मॅच्युर होत आहेत. म्हणजे वेदांता कंपनीला हे पैसे व्याजासह परत करायचे आहेत.
मूडीजचे म्हणणे आहे की वेदांता कंपनी आपल्या कर्जासाठी निधी उभारण्यात कोणतीही प्रगती दाखवू शकली नाही. अशा परिस्थितीत पुढील काही महिन्यांत कर्जाबाबतची जोखीम वाढली आहे. त्यामुळे मूडीजने वेदांताचे रेटिंग कमी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.