Virender Sehwag: कोरोनापासून शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांची वाढ झाली आहे. कोरोना काळात शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती जवळपास निम्म्या झाल्या होत्या, त्यानंतर किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाती उघडली.
परंतु सध्या सोशल मीडियावरील अनेक इन्फ्लुएन्सर त्यांच्या खात्यांवरून सामान्य लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
ज्यात सोशल मीडियावर नोंदणी नसलेल्या लोकांच्या सांगण्यावरून सर्वसामान्य लोक शेअर बाजारात पैसे गुंतवत आहे. याचाच फटका क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागलाही बसला आहे.
वीरेंद्र सेहवागने X (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या ट्विटमध्ये सांगितले की असे लोक कमिशन घेऊन शेअर्स पंपिंग आणि डंपिंगचे काम करतात. तुम्ही अनेक निरपराधांना फसवले आहे आणि तुमचा खेळ संपला आहे. ViaWealthy नावाच्या अकाऊंटवरून केलेल्या ट्विटला उत्तर देताना सेहवागने ही माहिती दिली.
ViaWealthy ने ट्विट केले होते की, “सर, मला 20 हजार रुपयांची भीती वाटत नाही, मला टी-शर्टची भीती वाटते”. यावर सेहवागने उत्तर दिले, “मी तुझ्यासारख्या फरार चोरांना घाबरतो.
जे कमिशनसाठी शेअर्स खरेदी करतात आणि नंतर ते त्यांच्या क्लायंटच्या खात्यात टाकतात. तुम्ही अनेक निरपराध लोकांना फसवले आणि आता तुमचा खेळ संपला आहे.” मात्र, ज्या ट्विटवर सेहवागने उत्तर दिले होते ते आता डिलीट करण्यात आले आहे.
वीरेंद्र सेहवागने या सल्लागार फर्मवर पहिल्यांदाच आरोप केले आहेत असे नाही. याआधी सेहवागने 23 फेब्रुवारी 2022 रोजी सेहवागने प्रीतम देवस्कर यांच्यावर लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
प्रीतम देवस्कर हे सल्लागार आहेत आणि वेल्थी व्हाया नावाची सल्लागार फर्म चालवतात. कंपनीच्या एक्स हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, ही सेबीची नोंदणीकृत फर्म आहे.
वीरेंद्र सेहवागने सोमवारी दिलेल्या उत्तरावर अनेक प्रतिक्रिया आल्या. काहींनी याला विनोद म्हणून घेतले तर काहींनी सेहवागचे कौतुक केले.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.