Multibagger Stock Update: गुंतवणूकदार झाले मालामाल! 3 वर्षात एक लाखाचे झाले दीड कोटी, कोणता आहे 'हा' शेअर?

कंपनीचे शेअर्स सध्या 1243.40 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
Multibagger Stock
Multibagger StockSakal
Updated on

Multibagger Stock Update: वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीच्या (Waaree Renewable Technologies) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना तुम्ही विचार करु शकत नाही इतका परतावा दिला आहे.

सोलर पॅनल बनवणाऱ्या या कंपनीचे शेअर्स सध्या 1243.40 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 2,588.12 कोटी आहे.

3 वर्षात 15,000 टक्के परतावा

वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीच्या शेअर्सनी गेल्या तीन वर्षात 15000% चा जबरदस्त परतावा दिला आहे. जुलै 2020 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 8.20 रुपये होती, जी वाढून 1,243.40 रुपये झाली आहे.

म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांच्या पैशांमध्ये 151 पट वाढ झाली आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 कोटी 51 लाख झाले असते.

मार्च 2023 च्या तिमाहीत फर्मने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 74.9 कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत 60.7 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. तर निव्वळ नफा मार्च 2022 तिमाहीत 8 कोटींवरून मार्च 2023 तिमाहीत जवळपास दुप्पट होऊन 15.6 कोटी झाला.

मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत ऑपरेटिंग नफा वाढून 21.1 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 9.8 कोटी रुपये होता.

Multibagger Stock
Tata Group Stock: टाटा ग्रुपचा 'हा' शेअर करतोय रोज नवे विक्रम, 700 रुपयांचा आकडा होणार पार, काय सांगतात तज्ज्ञ?

वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी आधी संगम रिन्युएबल्स लिमिटेड म्हणून ओळखली जायची, जी वारी ग्रुपची उपकंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय सोलर ईपीसीचा आहे. वारी ग्रुपने 600 मेगावॅट पेक्षा जास्त कार्यक्षमतेसह 10 हजारहून अधिक सोलर प्रोजेक्ट यशस्वीरित्या स्थापित केले आहेत.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Multibagger Stock
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.