T+1 Settlement नंतर सेबी आणणार नवीन नियम, गुंतवणूकदारांना असा होणार फायदा

One-Hour Trade Settlement: T+1 सेटलमेंट प्रणालीमध्ये 24 तासांच्या आत शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा केले जातात.
SEBI
SEBI Sakal
Updated on

One-Hour Trade Settlement: T+1 सेटलमेंट सिस्टम ही शेअर्स सेटलमेंट सिस्टम आहे. सध्या हा नियम निवडक शेअर्ससाठी लागू आहे. हळूहळू उर्वरित शेअर्सही त्यात जोडले जातील. सध्या देशात T+2 सेटलमेंट प्रणाली लागू आहे. सध्या ही प्रणाली NSE आणि BSE या दोन्ही शेअर बाजारांवर लागू आहे.

जेव्हा गुंतवणूकदार किंवा व्यापारी शेअर्स विकतात किंवा खरेदी करतात तेव्हा शेअर्स डिमॅट खात्यात किंवा बचत खात्यात पैसे यायला थोडा वेळ लागतो.

सध्या, T+2 सेटलमेंट सिस्टम भारतात लागू आहे, म्हणजे खरेदी किंवा विक्रीच्या ऑर्डरच्या 2 दिवसांच्या आत शेअर्सची सेटलमेंट पूर्ण होते.

T+1 सेटलमेंट प्रणालीमध्ये 24 तासांच्या आत शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा केले जातात. स्टॉक एक्स्चेंजला नवीन सिस्टम अवलंब करण्याचा किंवा विद्यमान प्रणाली सुरू ठेवण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

SEBI
eRupee By SBI: आता UPI द्वारे होणार डिजिटल रूपयाचे व्यवहार, SBI ने करोडो ग्राहकांना दिली ही सेवा

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी)च्या अध्यक्षा माधवी पुरी-बुच म्हणाल्या की, “भारत हा जगातील पहिला देश आहे जीथे T+1 (ट्रेड प्लस वन डे) सेटलमेंट सुरु केली आहे. आता, आम्ही एका तासाच्या सेटलमेंटबद्दल विचार करत आहोत. ज्यामुळे तात्काळ सेटलमेंट होईल.''

SEBI
तर भारतातील राज्यांची अवस्था पाकिस्तानसारखी होणार? कर्जाने ओलांडली मर्यादा, कोण आहे यादीत

माधवी पुरी-बुच म्हणाल्या की “एआयचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे, आम्हाला विश्वास आहे की सूचीबद्ध कंपन्या, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा, गुंतवणूक व्यवस्थापक कंपन्या याचा वापर करतील. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला याचा फायदा होईल.''

आता काय नियम आहेत आणि नवीन नियम कधी लागू होऊ शकतो?

T+1 नियम सध्या ट्रेड सेटलमेंटबाबत लागू आहे म्हणजे डील सेटलमेंट ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजेच ट्रेडिंग डेच्या एक दिवसानंतर होते. पूर्वी हे T+2 सेटलमेंट होते जे आता T+1 झाले आहे.

SEBI चेअरपर्सन यांनी यासाठी कोणतीही कालमर्यादा नमूद केलेली नाही, परंतु Mint च्या वृत्तानुसार मार्च 2024 पर्यंत एक तासाच्या व्यापार सेटलमेंटची प्रणाली लागू केली जाऊ शकते आणि त्वरित सेटलमेंटची प्रणाली सहा महिन्यांनंतर म्हणजेच ऑक्टोबरपासून लागू केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.