Share Market : शेअर बायबॅक म्हणजे काय?

अन्य कंपन्याही शेअर बायबॅक करत असतात. त्यादृष्टीने बायबॅक म्हणजे काय?
what is share buy back share market stock analysis marathi news
what is share buy back share market stock analysis marathi newsSakal
Updated on

नुकतेच म्हणजे ११ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘टीसीएस’ या देशातील एका प्रमुख माहिती तंत्रज्ञान कंपनीने शेेअर बायबॅकची घोषणा केली आहे. याआधीही या कंपनीने शेअर बायबॅक केले आहेत. अन्य कंपन्याही शेअर बायबॅक करत असतात. त्यादृष्टीने बायबॅक म्हणजे काय? हे पाहू या.

जेव्हा एखादी कंपनी बाजारातून आपले शेअर शेअरधारकांकडून परत विकत घेते याला शेअर बायबॅक असे म्हणतात. ही प्रक्रिया पब्लिक इश्‍यूच्या अगदी उलट असते. बायबॅकची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंपनीने विकत घेतलेले शेअर अस्तित्वात राहत नाहीत. बायबॅकसाठी प्रामुख्याने टेंडर ऑफर किंवा ओपन मार्केट अशा दोन पद्धती वापरल्या जातात. एकूण वसूल भाग भांडवलाच्या (पेड अप कॅपिटल) २५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर एका आर्थिक वर्षात विकता येत नाहीत. याशिवाय बायबॅकनंतर कंपनीचा डेट इक्विटी रेशो २:१ पेक्षा कमी असता कामा नये.

‘बायबॅक’ची कारणे

कंपनीच्या ताळेबंदात जास्तीची रोकड (रिझर्व्ह आणि सरप्लस) असल्यास व तिची गुंतवणूक करण्यासाठी योग्य पर्याय किंवा व्यवसायात नवी संधी दिसून येत नसल्यास ही जास्तीची रोकड कंपनी आपले शेअर बायबॅकसाठी वापरते. कोणतेही संयुक्तिक कारण नसताना, कंपनीच्या शेअरचा भाव पडत असेल, तर भागधारकांना विश्वास देण्यासाठी ‘बायबॅक’चा वापर करण्यात येतो. प्रवर्तक आपला हिस्सा वाढविण्याच्या उद्देशाने बायबॅक करतात.

‘बायबॅक’चे फायदे

बायबॅकमुळे शेअरची संख्या कमी होत असल्याने ‘ईपीएस’ (अर्निंग पर शेअर) वाढतो. यामुळे नजीकच्या भविष्यात भागधारकाला जास्त लाभांश मिळू शकतो; तसेच बाजारात शेअरचा भाव वाढू शकतो. बायबॅकमुळे भागधारकास होणारा भांडवली नफा (कॅपिटल गेन) हा दीर्घमुदतीचा असल्याने, तो एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास वरील रकमेवर केवळ १० टक्के इतकाच कर द्यावा लागतो.

टेंडर ऑफर व ओपन मार्केट पद्धत

टेंडर ऑफर या पद्धतीमध्ये कंपनी आपला शेअर एका स्थिर किमतीस (फिक्स्ड प्राइस) विकत घेत असते. टेंडर ऑफर दहा कामकाजाच्या दिवसांसाठी खुली असते. ओपन मार्केट पद्धतीमध्ये कंपनी आपले शेअर बाजारातून विकत घेत असते व यामुळे किंमत स्थिर नसते.

ही प्रक्रिया जास्तीतजास्त सहा महिने किंवा बायबॅक इश्यू साइझ पूर्ण होईपर्यंत; यापैकी कमीतकमी कालावधीपर्यंत चालू असते. यामध्ये कंपनी कमाल किती किंमत देऊ करणार आहे, ते सांगितले जाते. मात्र, बऱ्याचदा या किमतीपेक्षा कमी किमतीलासुद्धा खरेदी होऊ शकते.

उदा. ‘पेटीएम’च्या बायबॅक इश्यूमध्ये खरेदीची कमाल किंमत ८१० रुपये ठेवली होती. प्रत्यक्षात खरेदी ४८०.२५ रुपये ते ७०२.६५ रुपयांच्या दरम्यान झाली. थोडक्यात, कमाल किमतीस शेअर खरेदी झाली नाही.

टीसीएस कंपनीकडून बायबॅक

१) बायबॅक जाहीर केल्याची तारीख : ११/१०/२०२३

२) ऑफर रक्कम : १७,००० कोटी रुपये

३) ऑफर नंबर ऑफ शेअर : ४०९६३८५५

(एकूण शेअरच्या १.१२ टक्के)

४) फेस व्हॅल्यू (दर्शनी मूल्य) : रु. १

५) बायबॅक प्राइस : रु. ४,१५०

६) बायबॅकचा प्रकार : टेंडर ऑफर

७) रेकॉर्ड डेट, बायबॅक ओपन व क्लोज डेट : अजून जाहीर व्हायची आहे.

‘बायबॅक’मध्ये सहभागी होणे भागधारकास बंधनकारक नाही. तसेच भागधारक सगळे किंवा काही शेअर विकू शकतो. कंपनीची ऑफर प्राइस मार्केट प्राइसच्या तुलनेने बऱ्यापैकी कमी असेल, तर रेकॉर्ड डेटच्या आधी बाजारातून शेअर घेऊन नफा कमवता येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.