Share Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक निकाल 4 जूनला लागणार आहे आणि गुंतवणूकदार पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची वाट पाहत आहेत. पण यावेळी विदेशी गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत.
 Lok Sabha election results on the stock market
Lok Sabha election results on the stock marketSakal
Updated on

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक निकाल 4 जूनला लागणार आहे आणि गुंतवणूकदार पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची वाट पाहत आहेत. पण यावेळी विदेशी गुंतवणूकदारांच्या अपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. 2023 मध्ये भारतीय शेअर बाजारांनी जगातील अनेक मोठ्या बाजारपेठांना मागे टाकले होते.

बाजार प्रत्यक्ष किमतीच्या पलीकडे गेल्याचे मानले जात असले तरी, गुंतवणूकदारांना आशा आहे की मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शेअर बाजारात काही काळ तेजीचा कल दिसून येईल.

गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की मोदी सरकार सत्तेवर येण्याचा अर्थ असा आहे की राजकीय स्थिरता आणि धोरणे कायम राहतील, ज्यामुळे बाजाराला आधार मिळू शकेल. यंदा मुंबई शेअर बाजाराचा बीएसई निर्देशांक चार टक्क्यांनी वाढला आहे.

विश्लेषकांच्या मते ही वाढ वर्षअखेरीस दुप्पट होऊ शकते. मात्र, भाजपच्या जागा कमी होण्याची भीती गुंतवणूकदार आणि सट्टा बाजाराला आहे. गेल्या वर्षी, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात 20.74 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. आशियातील बाजारपेठेतील ही सर्वात मोठी गुंतवणूक होती. मात्र निवडणुकीपूर्वी बराच पैसा बाहेर काढण्यात आला.

रॉयटर्सशी बोलताना फंड व्यवस्थापकांनी सांगितले की, जर मोदींच्या विजयाचे अंतर कमी झाले तर काही काळ बाजारात अस्थिरता येऊ शकते. विरोधी पक्ष जिंकल्यास बाजारात मोठी घसरण होऊ शकते. कारण धोरणांबाबत संभ्रम निर्माण होईल. "बाजाराला सातत्य हवे आहे," असे मुंबईस्थित ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक मितुल कलवाडिया यांनी सांगितले.

इंडिया आघाडी किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा विजय होणे अपेक्षित नाही. इंडिया आघाडीचा विजय झाल्यास, आश्चर्यकारक प्रतिक्रिया येऊ शकतात. गुंतवणूकदारांच्या मते, मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यापूर्वीची धोरणे सुरूच राहतील.

 Lok Sabha election results on the stock market
Gautam Adani: गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीत झाली 4,54,73,57,37,500 रुपयांची वाढ

यामध्ये आर्थिक व्यवस्थापन आणि चलन स्थिरतेत सुधारणा या गोष्टींचा समावेश आहे. मुंबईस्थित ॲक्सिस म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आशिष गुप्ता सांगतात, "गेल्या एक-दोन वर्षांत भारताने आर्थिक शिस्तीच्या बाबतीत चांगली स्थिरता दाखवली आहे. महागाईवरही नियंत्रण ठेवले आहे. यामुळे जोखीम कमी झाली आहेत. भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचे धोरण कायम राहील अशी आशा आहे.''

विवेक भुटोरिया, लंडन स्थित फेडरेशन हर्मीस इक्विटी फंडचे पोर्टफोलिओ व्यवस्थापक म्हणतात की स्पष्ट बहुमताचा आकडा उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी चांगला मानला जातो आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करतो.

 Lok Sabha election results on the stock market
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट; DA नंतर आता वाढली ग्रॅच्युइटीची मर्यादा

प्रचारादरम्यान विरोधी पक्ष काँग्रेसने भारतातील आर्थिक विषमता दूर करण्याचे धोरण ठरवले आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदार खूश होणार नाहीत.

सिंगापूरस्थित ऑलस्प्रिंग ग्लोबल इन्व्हेस्टमेंट्सचे पोर्टफोलिओ मॅनेजर गॅरी टॅन म्हणतात, "भाजपने समाज कल्याण योजनांवर जास्त अवलंबून राहण्यापासून दूर राहावे अशी आमची इच्छा आहे. अशा योजनांवर जास्त अवलंबून राहिल्याने खर्च वाढू शकतो आणि भारताची स्थिरता खराब होऊ शकते.'

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com